You are currently viewing आजीआजोबा

आजीआजोबा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखीत अप्रतिम काव्यरचना*

*आजीआजोबा*
****************
आजी आजोबा असले की
घराला घरपण असते
ते असल्यावर फिकीर
कसलीच नसते
त्यांच्या मायेच्या छायेत
घरात आनंदच दिसतो
मनातलं हितगुज
त्यांच्याच जवळ करतो
त्यांच्या सहवासात
दिवस कसे नवे नवे
वाटतात
म्हणून घरात आजीआजोबा
हवे असतातं

त्याच्या गोष्टी ऐकल्यात की
थकवा जाणवत नाही
डोक्यावरून हात
फिरवल्याशिवाय
त्यांनाही बरं वाटतं नाही
दोन्हीसांजेला ते
दिवा लावतील
नातवंडाना घेवून
शुभंम करोती म्हणतील
ते घरात असले की
समृद्धीचे दिवे पेटतात
म्हणून घरात आजीआजोबा
हवे असतात

शाळेच्या बाहेर
तासंतास बसतील
नातोबा दिसले की
घट्ट मिठी मारतील
कितीही मस्ती केलीतरी
ते रागवत नाही
नातवंडाशिवाय त्यांना
एकटे रहावत नाही
नातवंडाच्या लहानपणात
ते त्यांचे बालपण बघतात
म्हणून घरात आजीआजोबा
हवे असतात

आजीआजोबा घराची
शोभा असते
ते असले की घराला
रोषणाईची गरज नसते
सुख दुख आजारपणात
त्यांचाच आधार असतो
काळजीचा कळवळा
त्यांच्यात जास्त दिसतो
त्यांच्यासारखे मित्र
दुसरे कोणी नसतात
म्हणून घरात आजीआजोबा
हवे असतात

आजीआजोबा आणि
नातवंडाच नाते
खूप हळवे असते
त्यांच्या प्रेमाशिवाय
बालपण सरतं नसते
ते कसलेच हेवेदावे करत नाही
आणि कोणालाही अंतर देत नाही
आजीआजोबा औषधासारखे असतात
म्हणून ते घरात हवे असतात

घर कसेही असले तरी
पण घरात आजीआजोबा
असायलाच पाहिजे
त्यांच्यासोबत जीवनगाणी
गायलाच पाहिजे
कारण आजीआजोबांशिवाय
घराला घरपण नाही
आणि त्यांच्याशिवाय
बालपणही नाही

*संजय धनगव्हाळ*
९४२२८९२६१८

Advertisement

Web link

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − nine =