You are currently viewing कणकवलीत झालेल्या अपघातात विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने दुचाकीला दिली जोरदार धडक

कणकवलीत झालेल्या अपघातात विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने दुचाकीला दिली जोरदार धडक

कणकवली

कणकवली मुंबई गोवा महामार्गावर जाणवली उड्डाणपुलावर मोटरसायकल आणि वॅगनार कार यांच्यात भीषण अपघात झाला. कणकवलीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकी ला समोरून येणाऱ्या वॅग्नर कारने धडक दिली. अपघाताची तीव्रता एवढी होती की वॅगनार कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. यात दोघेजण गंभिर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. कणकवली पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. पांडुरंग पांढरे, राजकुमार मुंढे, येडवे घटनास्थळी दाखल झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा