वैभववाडी
वैभववाडी तालुक्यात सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या खोरकर (अरुळेकर ) रावराणे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच एका बैठकीत पार पडली. त्यामध्ये मंडळाचे नवे अध्यक्ष म्हणून श्री.गणपत दाजी रावराणे यांची तर सरचिटणीस पदी श्री.सुबोध पुंडलिक रावराणे यांची एकमताने निवड झाली आहे.
वैभववाडी तालुक्यातील बारा गावातील रावराणे समाजाचे मंडळ असून गेली कित्येक वर्षे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करीत आहे.रविवार दि.२ ऑक्टोबर रोजी विद्यार्थी उत्कर्ष मंडळ,चिंचपोकळी येथे सायंकाळी बैठक पार पडली. या बैठकीत २५ पैकी २४ सदस्य उपस्थित होते. यावेळी मंडळाचे नवे अध्यक्ष म्हणून गणपत दाजी रावराणे यांची पुन्हा तर सरचिटणीसपदी सुबोध पुंडलिक रावराणे यांची एकमताने निवड झाली आहे. उपाध्यक्ष म्हणून सदानंद दत्ताराम रावराणे, शैलेंद्र सच्चिदानंद रावराणे, कार्याध्यक्ष प्रभानंद शंकर रावराणे, खजिनदार मोहन बाळकृष्ण रावराणे, सहचिटणीस सत्यवान बाळकृष्ण रावराणे, जयसिंग परशुराम रावराणे,यांची निवड झाली आहे.
१७ कार्यकारिणी सदस्य
या मंडळात १७ कार्यकारिणी सदस्य असून त्यात
१)प्रताप बाळकृष्ण रावराणे,
२)उदय विनायक रावराणे,
३)ज्ञानेश्वर त्रिंबक रावराणे,
४)मिलिंद विश्वनाथ रावराणे,
५)संजय पांडुरंग रावराणे,
६)संतोष सीताराम रावराणे ७)सागर अरुण रावराणे,
८)महेश रघुनाथ रावराणे,
९)श्रीधर मधुकर रावराणे,
१०)राकेश रणजित रावराणे,
११)महेश प्रकाश रावराणे,
१२)प्रभाकर गणपत रावराणे,
१३)विनायक सज्जन रावराणे,
१४)विजय बाळकृष्ण रावराणे,
१५)विक्रम दुलाजी रावराणे,
१६)अर्जुन बाबुराव रावराणे,
१७)सुरेश विष्णू रावराणे,यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे.