जामसंडे येथे जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेला प्रारंभ
देवगड
बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होणे म्हणजे बुद्धीच्या विकासाबरोबर एकाग्रतेचा विषय महत्वाचा आहे .या माध्यमातून आपल्या आयुष्याच्या पटलावर निश्चितपणे यशस्वी होता येते .त्यासाठी आत्मविश्वासही महत्वाचा आहे.असे प्रतिपादन सरपंच विकास दीक्षित यांनी जामसंडे येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यात बोलताना केले.या निमित्ताने सरपंच विकास दीक्षित यांनी श्रीधर दीक्षित ,नीलकंठ दीक्षित यांच्या समाजपयोगी सेवेबद्दल तसेच दातृत्वाबद्दल माहिती दिली.
कै.नीलकंठ श्रीधर दिक्षित यांचे पुण्यस्मरणार्थ पुरस्कृत, कै.अथर्व अशोक दिक्षित चषक जामसंडे सन्मित्र मंडळ,जामसंडे यांच्यावतीने २ ऑक्टोंबर २०२२ रोजी जिल्हास्तरीय बुध्दीबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेचे उदघाटन श्री गणेश पूजन दिपप्रजवलन करून माजी आमदार ऍड अजित गोगटे,बिपीन जोशी,सरपंच विकास दीक्षित,जिल्हा बँक संचालक ऍड प्रकाश बोडस प्रायोजक निरंजन दीक्षित यांच्या.प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या वेळी भाजयुमो मुंबई महामंत्री हेमंत ठुकरुल ,हनुमान क्रीडा मंडळ अध्यक्ष विलास रुमडे,नगरसेवक शरद ठुकरुल ,आद्या गुमास्ते ,महेश भडसाळे, सन्मित्र मंडळ अध्यक्ष राजा भुजबळ,कार्यवाह चंद्रकांत पाटकर,स्पर्धा संयोजक अभिषेक सांगळे, सुयश पेठे,उपस्थित होते .सूत्रसंचालन प्रास्तविक रेश्मा जोशी गावकर यांनी करून कै. अथर्व अशोक दीक्षित या गुणवंत विद्यार्थी विषयी माहिती विशद केली.
या जिल्हास्तरीय स्पर्धेत १५१ स्पर्धकांनी सहभाग घेतला.शालेय व खुला गट या दोन गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेने या पूर्वीच्या जिल्हास्तरीय १२० स्पर्धकांचा रेकॉर्ड तोडला आहे.या स्पर्धच्या निमित्ताने मान्यवरांचा सन्मान शाल सन्मानचिन्ह,पुष्पगुच्छ देऊन आयोजक सन्मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आला.
या वेळी माजी आमदार ऍड अजित गोगटे,बिपीन जोशी,ऍड प्रकाश बोडस ,हेमंत ठुकरुल ,यांनी उपस्थित स्पर्धकांना मार्गदर्शन करून शुभेच्छा व्यक्त केल्या .