You are currently viewing श्री महाकाली (कोलकाता)

श्री महाकाली (कोलकाता)

 

कालीघाट शक्तिपीठ हे 51 शक्ती पिठापैकी एक शक्तिपीठ आहें. कोलकाता मधील हे एक जागृत देवीचे स्थान मानले जाते. कोलकत्यात दोन काळिमादिरे आहेत. कालिघाट शक्तीपीठ मंदिर हुबळी नदीच्या काठावर स्थित आहें. शोष्टीताला ही एक आयता कृती वेदी असून ती तीन फूट उंच आहें. ही वेदी झाडाखाली असून त्यावर तीन दगड आहेत. ज्याला शोष्टीदेवी, शीतला देवी, आणि मंगल चंडी असे मानले जाते. त्या देवीचे प्रतिनिधीत्व करतात. यां पवित्र जागेला बंगाली मध्ये शोष्टीताला म्हणतात. यास मोनोषाताला म्हणून पण ओळखले जाते. 1880 मध्ये श्री गोविंदादास मोंडेल यनी ही वेडी बनवली. वेडीच्या स्थानाजवळ श्री ब्राह्मगिरी यांची समाधी आहें. येथे सर्व याजक महिला आहेत. येथे कोणतीही पूजा किंवा अन्न भोग अर्पण केला जात नाही.

भारतातील 51 शक्तिपीठ पैकी हे एक मानले जाते. हे मंदिर मोठे असून काली देवींची मोठी प्रतिमा येथे आहें. ही प्रतिमा शंकराच्या छातीवार पाय देऊन उभी आहें. गळ्यात नरमुंड माळा परिधान केली आहें. एका हातात नरमुंड असून त्यातून रक्त गळत आहें. एका अख्यायीके नुसार कालिमाता खूप क्रोधीत झाली. आणि ति नर संहार करू लागली. तिचा क्रोध शांत करण्यात साठी भगवान शंकर तिच्या मार्गात झोपले काली माताने त्यांच्या छातीवर पाय ठेवला तेव्हा तिच्या लक्षात आले की हे भगवान शंकर आहेत तेव्हा तिचा राग शांत झाला.

महाकालीचे कोलकाता येथील दुसरे मोठे मंदिर म्हणजे रामकृष्ण परमहंस यांना जिथे महाकालीने दर्शन दिले होते. ते मंदिर, दक्षिणेश्वर महाकाली मंदिर हे मंदिर पण हुगली नदीच्या काठावर स्थित आहें. यां मंदिरातूनच रामकृष्ण परमहंस यांना अध्यात्मिक ज्ञान प्राप्त झाले. कोलकाता शहरांची जमीनदार राणी रासमतीस महाकालीने स्वप्नात दृष्टांत दिला आणि तिने मंदिर बांधण्यास सांगीतले. तिने सांगितल्या प्रमाणे मंदिराची रचना करण्यात आली. 25 एकर क्षेत्रात हे मंदिर बांधले आहें. यां मंदिराचे बांधकाम 1847 मध्ये सुरु करण्यात आले. आणि ते 1855 मध्ये बांधून झाले. यां मंदिराला महाकाली दक्षिणेश्वर मंदिर म्हणतात. यां मंदिराच्या समोर नट मंदिर आहें.  या मंदिराच्या उत्तरेस राधाकृष्ण मंदिर आहें तर पश्चिमेंस शिव मंदिर आहें. नवरात्रात यां ठिकाणी मोठी जत्रा असते. लाखो भाविक दरवर्षी यां मंदिरासमोर भेट देतात.

कोटराक्षी कुल श्रेष्ठा माहिती, बहुभाषिनी सुमती : कुमतीश्चंडा चंड मुंड वेगिनी l

प्रचंडा चंडिंका, चंडी चर्चीका, चंड वेगिनी, सुकेशी मुक्त केशी च दीर्घ केशी महा कचा ll

 

कल्पना तेंडुलकर

ओरोस.

प्रतिक्रिया व्यक्त करा