You are currently viewing सावंतवाडीत उद्या नरेंद्राचार्यजी महाराजांच्या पादुकांचा दर्शन सोहळा

सावंतवाडीत उद्या नरेंद्राचार्यजी महाराजांच्या पादुकांचा दर्शन सोहळा

मोठ्या संख्येने उपस्थित रहा; स्व-स्वरुप संप्रदायाच्यावतीने भक्तगणांना आवाहन….

सावंतवाडी

जगद्गुरू रामानंदचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुकांचा दर्शन सोहळा उद्या सावंतवाडीत आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सकाळी १० वाजल्यापासून येथील जिमखाना मैदानावर होणार आहे. यावेळी जास्तीत-जास्त स्वामी भक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग स्व-स्वरुप संप्रदायाच्यावतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रींचे पादुका आगमन, सामाजिक उपक्रम, गुरुपूजन, आरती सोहळा, प्रवचन, उपासक दीक्षा, दर्शन, पुष्पवृष्टी आदी धार्मिक विधी होणार आहेत. यावेळी श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांच्या भक्तगणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा