You are currently viewing कणकवली उपविभागीय कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा संपन्न

कणकवली उपविभागीय कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा संपन्न

 

कणकवली, देवगड व वैभववाडी तालुक्यातील निश्चित प्लॉटधारक शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या फलोत्पादन पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) आंबा व काजू पिक सन 2022- 23 अंतर्गत, उपविभागस्तरीय कार्यशाळा दि.29.09.0.2022 रोजी महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे कृषी चिकित्सालय सभागृह नांदगाव तथा कणकवली येथे संपन्न झाली.

सदर कार्यशाळेत श्री .पी. बी. ओहोळ उपविभागीय कृषी अधिकारी कणकवली, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील कीटकशास्त्रज्ञ व हॉर्टसॅप प्रकल्प अन्वेषक डॉ.विजयकुमार देसाई, डॉ.अजय मुंज, (कीटकशास्त्रज्ञ) डॉ.गोपाळ गोळवणकर (संशोधन सहयोगी) श्री.वैशाली मुळये (कणकवली तालुका कृषी अधिकारी), श्री. कैलास ढेपे (देवगड तालुका कृषी अधिकारी), कृषी अधिकारी कृषी चिकित्सालय व रोपवाटिका नांदगाव हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

श्री.पी.बी.ओहोळ यांनी या कार्यशाळेचा उद्देश व महत्त्व स्पष्ट करताना विभागाच्या विविध योजनेची विस्तृत माहिती दिली. या कार्यशाळेच्या तांत्रिक सत्रात प्रादेशिक व संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील शास्त्रज्ञ डॉ.विजयकुमार देसाई यांनी काजू पिकावरील किडी – रोगांची ओळख व नियंत्रण आणि आंबा पिकावरील रोगांची ओळख व नियंत्रण याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच आंबा पिकावरील महत्त्वाच्या किडींची ओळख व नियंत्रण याविषयी डॉ.अजय मुंज यांनी डॉ.गोपाळ गोळवणकर यांनी आंबा पिकावरील इतर दुय्यम किडींची ओळख व नियंत्रण या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेस उपस्थित अंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्या व पिक संरक्षणाचे यांचे अनुभव शास्त्रज्ञ व कृषी विभाग अधिकारी यांच्यासमोर मांडून त्यावर सखोल चर्चा केली. या प्रशिक्षणादरम्यान एकूण 75 शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित कृषी विभागाच्या अधिकारी वर्ग व शेतकऱ्यांना आंबा पिक संरक्षण पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एकनाथ गुरव व आभार प्रदर्शन श्री.कैलास ढेपे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा