You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकारी यांचा सन्मान सोहळा

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकारी यांचा सन्मान सोहळा

मालवण :

मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने पत्रकार पाल्यांसह सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकारी यांचा सन्मान सोहळा मसुरे-मर्डे येथील भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल सभागृह येथे शनिवार १ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती मालवण तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष संतोष गावडे व उपाध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर यांनी दिली.

तहसीलदार अजय पाटणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या सत्कार सोहळ्यास भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल कमिटी अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, मर्डे सरपंच संदीप हडकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, उपाध्यक्ष बंटी केनवडेकर, कार्यकारिणी सदस्य महेश सरनाईक आदी मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मान्यवरांच्या हस्ते मालवण तालुक्यातील पत्रकार पाल्यांचा गौरव केला जाणार आहे. तरी पत्रकार बांधवांनी या कार्यक्रमाला सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन पत्रकार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × two =