सहावी माळ
श्री कात्यायनी नमः l
चंद्रहासोज्ज्वलकरा शार्दूल वर वाहन कात्यायनी शुभदध्यl देवी दानवघातीनी ll
श्री देवी पार्वती चे नाव कात्यायनी असे नाही. भगवती दुर्गा मातेच्या सहाव्या स्वरूपाचे नाव कात्यायनी आहें. परमेश्वराच्या नैसर्गिक क्रोधा तुन ही देवी उत्पन्न झाली. महर्षी कात्यायांनांची कठोर तपश्चर्या पाहून प्रसन्न झालेल्या देवीने त्यांच्या इच्छे नुसार त्यांची कन्या म्हणून जन्म घेतला. महर्षी कात्या यनानी तिची सर्व प्रथम पूजा केली म्हणून देवीचे नाव कात्यायनी असे पडले. संस्कृत शब्द कोषात पुढील प्रमाणे देवींची नावे आहेत. उमा, गौरी, हेमावती, ईश्वरीशी अनेक नावे आहेत. यजूरवेदात तैत्तरीय आरण्यका मध्ये कात्यायनी देवीचा प्रथम उल्लेख आला आहें.नवरात्रात सहाव्या दिवशी यां देवींची पूजा केली जाते म्हणून यां देवीला षषठी देवी असे ही नाव आहें. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड यां ठिकाणी यां देवीला छठी असे स्थानिक भाषेत म्हणतात. तिला छठी माता असेही म्हणतात. याचा उल्लेख ब्रह्मवैवर्त पुराणात आढळतो.
यां दिवशी साधकाचे मन आज्ञा चक्रात असते. योग साधनेत यां चक्राचे अत्यंत महत्वाचे स्थान आहें.
विजया दशमीला अस्त्र, शस्त्र, वाहनाची पूजा केली जाते ही देवी दशभूजा
असून तिच्या हातात चक्र, त्रिशूळ, धनुष्यबाण, गदा,तलवार, शंख, परशु, इत्यादी आयुधे आहेत. देवीचे वाहन सिंह आहें. यां देवीत दुर्गा शक्ती, काली शक्ती, चामुंडा शक्ती सामील आहेत. विजया दशमीला कात्यायनीने महिषसूर राक्षसा चा वाढदिवसाच्या केला.
उत्तर प्रदेशात मथुरे जवळ वृंदावनात भुतेश्वर स्थाना जवळ आद्य कात्यायनी देवीचे मंदिर आहें हे प्राचीन सिद्धपीठ मानले जाते.
कात्यायनी महामाये महायोगीन्यधीश्वरी नंद गोप सुत देवी पती में कुरु ते नमः ll
कल्पना तेंडुलकर
ओरोस.