You are currently viewing पाचवी माळ श्री स्कंधमाता

पाचवी माळ श्री स्कंधमाता

 

 

सिंहासनागता नित्य पद्माश्रितकरद्वया l शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी ll

भगवती दुर्गामातेचे पाचवे स्वरूप स्कंदमाता यां नावाने परिचित आहें. भगवान स्कंद
म्हणजे कार्तिकस्वामी, कुमार, षडानन, ही त्याची अन्य नावे आहेत. स्कंदाची माता असल्या मुळे या देवीला स्कंदमाता असे म्हणतात. नवरात्रात पाचव्या दिवशी हया देवींची पूजा केली जाते. यां दिवशी साधकाचे मन विशुद्ध चक्रात असते. त्यावेळी त्याच्या समस्त बाह्य क्रियांचा आणि चित्त वृत्तीचा लोप होतो. यां दुर्गेचा वर्ण पूर्णतः शुभ्र आहें. सिंह हे वाहन आहें.  यां देवी च्या उपासनेने मनातील इच्छा पूर्ण होतात.सूर्यमंडळातील अधिषठात्री देवी मानली जाते. तिचे तेज अलौकिक असून कांती तेजोमय आहें.
पुढील मंत्राचा जप करतात
यां देवी सर्व भुते्षु माँ स्कंद माता रुपेण संस्थिता l
नमस्तसै नमस्त सै नमत्स सै
नमो नमः l
रंग.. हिरवा
माळ.. तुळशीमाळ
कल्पना तेंडुलकर
ओरोस..

प्रतिक्रिया व्यक्त करा