You are currently viewing सावंतवाडी नगरपलिकेतील सत्ताधारी पक्षाच्या गट नेत्यांवरच पाण्यासाठी घागर आंदोलन करण्याची आली वेळ….

सावंतवाडी नगरपलिकेतील सत्ताधारी पक्षाच्या गट नेत्यांवरच पाण्यासाठी घागर आंदोलन करण्याची आली वेळ….

नगरसेवक राजू बेग यांचे नगरपलिकेत घागर वाजवत आंदोलन…

सावंतवाडी नगरपलिकेतील सत्ताधारी गटाचे गटनेते नगरसेवक राजू बेग यांच्या माठेवाडा प्रभागात काल संध्याकाळपासून नळाला पाणी आलेले नाही, त्यामुळे नळाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. दोन दिवस पाणी नसल्याने लोकांचे प्रातर्विधीपासून आंघोळीचे प्रचंड हाल होत आहेत.
माठेवाडा प्रभागाचे नगरसेवक राजू बेग हे प्रकारामुळे संतप्त झाले आणि गांधीवादी विचारातून त्यांनी नगरपालिकेच्या आवारात घागर वाजवून सत्ताधाऱ्यांचाच निषेध करत प्रभागात पाणी वाचून होत असलेल्या भावनांना आपल्या आंदोलनातून वाट मोकळी करून दिली.
सत्ताधाऱ्यांच्याच गटनेत्यांच्या नगरपलिकेत पाण्यासाठी आंदोलन करावे लागत असल्याचने सर्वसामान्य लोकांची काय परिस्थिती असेल असा प्रश्न सावंतवाडीकरांमधून उपस्थित झाल्यास आश्चर्य वाटू नये..

प्रतिक्रिया व्यक्त करा