You are currently viewing सावंतवाडी येथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेळेवर गाडी सोडण्यासाठी वेंगुर्ले भाजपा ची एस्. टी. प्रशासनाकडे मागणी

सावंतवाडी येथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेळेवर गाडी सोडण्यासाठी वेंगुर्ले भाजपा ची एस्. टी. प्रशासनाकडे मागणी

वेंगुर्ले

वेंगुर्ले तालुक्यातील बरीच मुले सावंतवाडी येथील भोसले पाॅलिटेक्निक ला शिकण्यासाठी जातात . परंतु त्या मुलांना सावंतवाडी येथे जाण्यासाठी सकाळी ८ = ३० ची बस असल्यामुळे ती ९ = ३० वाजता सावंतवाडी स्थानकावर पोहचते , परंतु भोसले पाॅलिटेक्निक काॅलेज ची बस विद्यार्थ्यांना नेण्यासाठी सावंतवाडी स्थानकावरुन ९ = ०० सुटत असल्यामुळे वेंगुर्ले तुन जाणारयांना ती गाडी मीळत नाही , त्यामुळे हे विद्यार्थी वेळेत काॅलेजला पोहचत नसल्याने शैक्षणिक नुकसान होते.
ही अडचण विद्यार्थी व पालकांनी भाजपा पदाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर भाजपा शिष्टमंडळाने वेंगुर्ले आगार प्रमुखांची भेट घेऊन निवेदन दिले , व लवकरात लवकर ही ८ = ३० बस ८ = ०० वाजता सुरू करावी अशी मागणी केली . यावेळी प्रदेश का का सदस्य शरदजी चव्हाण , जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर , साईप्रसाद नाईक , बाबली वायंगणकर , दिपक नाईक , शैलेश जामदार , आरवली सरपंच तातोबा कुडव , खानोली उपसरपंच सुभाष खानोलकर , रविंद्र शिरसाठ , शेखर काणेकर , महादेव नाईक , पुंडलिक हळदणकर , प्रीतम उर्फ पींटू सावंत , सुधीर गावडे , सुनील घाग इत्यादी उपस्थित होते .
एस् .टी. प्रशासनाने सुद्धा या मागणीची दखल घेतली व सोमवार दिनांक २६ सप्टेंबर पासुन ही बस ८ = ०० वाजता सुरू केली . त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी भाजपा व एस्. टी.प्रशासनाचे आभार मानले .

प्रतिक्रिया व्यक्त करा