सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून मोठी उपस्थिती असणार….
सावंतवाडी
मुंबईत होणाऱ्या शिवसेना-शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला हजारोंच्या संख्येने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहे, असा दावा गटाचे नेते अशोक दळवी यांनी केला आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक आज पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला तालुक्यातील राजन पोकळे, अशोक दळवी, गणेशप्रसाद गवस, नारायण राणे, नितीन मांजरेकर, ॲड. सौ. निता सावंत, श्रीम. अनारोजीन लोबो, राजू निंबाळकर, सौ. भारती मोरे, गजानन नाटेकर, सचिन वालावलकर, नितीन शिरोडकर, सुनिल मोरजकर, हर्षद सावंत, तुकाराम बर्डे, मंगलदास देसाई, राघोजी सावंत, बाबू कुडतरकर, विनायक दळवी, दादा देसाई, रामदास मेस्त्री, सौ. वैष्णवी केसरकर, भैय्या गोवेकर, लवू मिरकर, योगेश महाले, गोपाळ गवस, सानवी गवस, भगवान गवस, महेश सामंत, दादा सारंग, रुपेश मुंडये, कौशिक परब, उमा मठकर, प्रतिक्षा पाटकर आदी पदाधिकारी व शिवसैनिक मेळावा यशस्वी होण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत.