कणकवली
कणकवली उपविभाग अंतर्गत असलेल्या तालुक्यांमध्ये चालू असलेल्या अनधिकृत धंदयावर कारवाई करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी एका निवेदनाद्वारे कणकवली उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. कांबळे यांना दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेले कित्येक दिवस गोवा बनावटीची अवैद्य दारू, मटका जुगार वेश्याव्यवसाय अमली पदार्थ या धंद्यांना ऊत आलेला आहे. अत्यंत बिनदिक्कतपणे सदर धंदे अधिक जोमाने चालू आहे पोलिसांचा धाक कोणत्याही स्वरूपाचा राहिलेला नाही.हे यातून दिसत आहे. कदाचित कुंपणच शेत खाते का…? असा काहीसा सवाल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हावासीयांना पडलेला आहे. आज अनेक तरुण मंडळी या अमली पदार्थ व दारूच्या गुटख्याच्या जुगाराच्या आहारी गेलेले आहेत. त्यामुळे अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. तरुण पिढी गुन्हेगारी मार्गाकडे वळून उद्ध्वस्त होताना दिसत आहेत.याचे उदाहरण म्हणजे व्हेलं माशाची उलटी.. आज या तस्करीच्या प्रकरणात सर्व तरुण मंडळी जिल्ह्यातीलच आहेत. जिल्ह्यात राजरोसपणे चालू असलेल्या अनधिकृत धंद्यांची तेजी आणि यातूनच मिळालेले एक प्रकारचं पाठबळ नाही का..? असा सवाल मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी निवेदनाद्वारे विचारला आहे
याकडे आपल्या उपविभाग पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून जरब असणे आवश्यक आहे. आज जुगार मटका यामुळे पैशाच्या हव्यासाने व्यसनाधीन होऊन अनेक तरुण वैफल्यग्रस्त झालेले आहेत. गुटखा तर आज सर्रासपणे प्रत्येक टपरीवर पाहायला मिळतो. मात्र या गुटख्याच्या जिल्ह्यातील वितरकांना पोलिसांना पकडणे कधीच शक्य होत नाही. एकीकडे महाराष्ट्रात गुटखाबंदी असून देखील राजरोसपणे विकला जाणारा गुटखा पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेला काळिमा फासणारे आहे. गोवा बनावटीच्या दारु बाबत अनेकदा कारवाई झालेली दिसून येते. मात्र या पोलिस यंत्रणेकडून केलेली जात नाही. हे उघड आहे. जिल्ह्यात या अनधिकृत धंद्यान बाबत असलेला आलबेल कारभार हा चिंतेचा असून कुटुंबांना तरुणांना उध्वस्त करणार आहे. जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेने त्याची योग्य ती दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे आहे.
महाराष्ट्राच्या इतर भागाप्रमाणे सिंधुदुर्गात देखील काही पाकिस्तानधार्जीने समाजकंटक अथवा अन्य संघटना असल्यास त्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आपले स्तरावरुन पावले उचलण्यात यावीत. ही देखील आमची प्रमुख मागणी आहे.
या निवेदनाची आपल्या कार्यालयाकडून योग्य ती दखल घेऊन योग्य ती कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आपल्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी दिला आहे.
मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांच्यासोबत मनसे कार्यकर्ते निलेश मेस्त्री, धनराज गोरे, समीर सावंत, सचिन सावंत प्रदीप पराडकर ,सुजल कदम यावेळी उपस्थित होते.