You are currently viewing नगराध्यक्ष समीर नलावडे मित्रमंडळातर्फे कणकवलीत 20 नोव्हेंबर रोजी ‘एक दिवस छोट्यांचा’ कार्यक्रम…!

नगराध्यक्ष समीर नलावडे मित्रमंडळातर्फे कणकवलीत 20 नोव्हेंबर रोजी ‘एक दिवस छोट्यांचा’ कार्यक्रम…!

खाऊ गल्लीसह बच्चेकंपनीसाठी विविध मनोरंजनाचे उपक्रम!

कणकवली

येत्या 20 नोव्हेंबर रोजी चौंडेश्वरी मंदिरानजीक गणपती साना येथे एक छोट्या मुलांसाठी एक दिवस छोट्यांचा, खाऊ गल्ली उपक्रमाचे आयोजन समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. २० नोव्हेंबर रोजी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सायंकाळी 5 वाजता या उपक्रमाचे उद्घाटन केले जाणार आहे. कोरोना नंतर हा उपक्रम अजून उत्साहात आयोजित करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. नगराध्यक्ष दालनात पत्रकार परिषदेत श्री. नलावडे बोलत होते.

यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक अभिजीत मुसळे, माजी नगरसेवक बंडू गांगण, आदि उपस्थित होते.

श्री. नलावडे पुढे म्हणाले, मुंबईत येथील गायक सौरभ दफ्तरदार, तृप्ती दामले यांची गाण्याच्या मैफिलचा नजराणा पेश केला जाणार आहे . कॉमेडी कम अँकर विजय नायर हे देखील या निमित्ताने उपस्थित असणार आहेत. बोलक्या बाहुल्या व जादूगार लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवणाऱ्या सुचित्रा कुमार यांचे देखील जादूचे प्रयोग व बोलक्या बाहुल्यांचा कार्यक्रम होणार आहे. लहान मुलांना आकर्षण असणारे वेगवेगळ्या प्रकारचे कार्टून या ठिकाणी असणार आहेत. या ठिकाणी सेल्फी पॉईंट देखील केला जाणार आहे. लहान मुलांना मज्जा मस्ती करता यावी , थोडा विरंगुळा मिळावा या उद्देशाने खाऊ गल्ली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.खाऊ गल्लीमध्ये येणाऱ्या सर्व मुलांना खाऊ साठी 50 रुपयांचे कुपन दिले जाणार आहे. तसेच या वेळी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल मोफत लावण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सेल्फी पॉईंट, झोपाळे, पाळणी, अनेक खेळणी देखील या ठिकाणी असणार आहेत. स्थानिकांना, बचतगटाना स्टॉल साठी प्राधान्य देण्यात येणार देणार आहे. यासाठी 8×10 ची जागा देणार असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असणार आहे. या खाऊ गल्ली मध्ये पिझा, पाणीपुररी, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स, शोरमा, चायनीज, असे अनेक स्टॉल असणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे अहवाल श्री नलावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा