You are currently viewing वेंगुर्ले शहरातील भाजपच्या युवा कार्यकर्त्यांचे सेवा पंधरवडाच्या निमित्ताने रस्त्यावरील खड्डे बुजवुन सेवाकार्य

वेंगुर्ले शहरातील भाजपच्या युवा कार्यकर्त्यांचे सेवा पंधरवडाच्या निमित्ताने रस्त्यावरील खड्डे बुजवुन सेवाकार्य

वेंगुर्ले :

 

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरात सेवा पंधरवडा आयोजित केला जात असताना, वेंगुर्ले शहरातील भाजपा च्या युवा कार्यकर्त्यांनी हाॅस्पीटल नाका ते भटवाडी या नगरपरिषद हद्दीतील रस्त्यावरील खड्डे सिमेंट काँक्रीट च्या सहाय्याने बुजवुन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला.

वेंगुर्ले तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा मध्ये आरोग्य शिबीर, रक्त दान शिबीर, नेत्रचिकीस्ता व मोतीबिंदू तपासणी शिबीर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप, मुलांना खाऊ वाटप, केंद्र सरकार च्या योजनांचे लाभ इत्यादी सेवाकार्य करून पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा वाढदिवस उस्ताहात साजरा केला. परंतु वेंगुर्ले शहरातील भाजपा च्या युवा कार्यकर्त्यांनी अनोखे असे सेवाकार्य करून एक नवीन पायंडा पडला.

यावेळी भटवाडी येथील युवा नेतृत्व प्रीतम उर्फ पींटू सावंत यांच्या नेतृत्वाखाली आदित्य खानोलकर, बाळा गावडे, चिमलो आरावुज, दत्ताराम तावडे, भुषण सावंत, योगेश गोवेकर, सुभाष सोनुरलेकर, कपिल सावंत, प्रथमेष सावंत, शुभम सावंत, नवनाथ सावंत, आनंद कळेकर, सचिन मांजरेकर इत्यादी युवकांनी या सेवाकार्यात सहभागी होऊन नागरिकांना रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करुन दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा