बचत गट आणि लघुउद्योग करणाऱ्यांचे संवाद करणार मार्केटिंग
नैसर्गिक साधनसंपत्तीने युक्त अशा सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठमोठे उद्योगधंदे आजपर्यंत उभे राहिले नाहीत. निसर्गाचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील लोकांनी विनाशकारी प्रकल्पना थाराच दिला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील गाव खेड्यांची छोट्या शहरांची आर्थिक जीवनवाहिनी म्हणजे लघुउद्योग आणि घरबसल्या छोटे मोठे उद्योग करणारे बचतगट…!
बचतगट हा नाबार्डचा सूक्ष्म वित्त पुरवठ्यातील जगातील सर्वात मोठा कार्यक्रम. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावागावात, शहरांमध्ये अनेक बचतगट कार्यरत आहेत. काही बचतगट उत्तम कार्य करून रोजगार निर्मिती करत आहेत. परंतु बहुतांश बचतगट हे सण सोहळे, महोत्सव, उत्सव आदी काळात कार्यरत असतात . इतर दिवसात ते कुठलेही उत्पादन घेत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे उत्पादित मालाला उपलब्ध न होणारी बाजारपेठ…ग्राहक…! परंतु बाजारपेठ किंवा ग्राहक उपलब्ध न होणे याचे कारण कोणी शोधलं आहे का????
खरंतर *जे पिकतं ते नक्कीच विकतं...* परंतु विक्री होण्यासाठी, माल खपण्यासाठी आवश्यक असतो तो म्हणजे प्रामाणिक प्रयत्न… आणि या प्रयत्नांची पहिली पायरी म्हणजे उत्पादित मालाची जाहिरात होणे…जाहिरात करणे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कित्येक बचतगट हे गाव मर्यादित राहिले कारण त्यांची जाहिरात झाली नाही. आजकाल *शोबाजी करणारे चमकतात…* आणि ही शोबाजी म्हणजेच जाहिरात…लोकांच्या दृष्टीस जोपर्यंत उत्पादन, उत्पादित माल पडत नाही तोपर्यंत कोणीही ग्राहक मिळत नाही. ग्राहकांपर्यंत आपले उत्पादन वस्तू रूपाने अथवा जाहिरातीच्या रूपाने पोचणे आवश्यक आहे आणि त्यासाठी सर्वात उत्तम आणि सहज उपलब्ध होणारे माध्यम म्हणजे सोशल मीडिया न्युज पोर्टल. संवाद मीडियाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बचतगट आणि लघुउद्योग यांची झालेली कुचंबणा पाहून जिल्ह्यातील लघुउद्योग आणि बचतगटांचे मार्केटिंग करण्याची तयारी दर्शवली असून बचतगटांना व लघुउद्योगांना पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यातील बचतगट आणि लघु उद्योजकांनी संवाद मीडियाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.