You are currently viewing महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 8 ऑक्टोबर रोजी

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 8 ऑक्टोबर रोजी

सिंधुदुर्गनगरी 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी  महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित,गट-ब संयुक्त पुर्व परीक्षा-2022 शनिवार दि. 8 ऑक्टोबर  रोजी सकाळी  11 ते 12 या वेळेत होणार होणार असल्याची माहिती  प्र.निवासी उपजिल्हाधिकारी अविशकुमार सोनोने यांनी दिली..

          कणकवली तालुक्याती विद्यामंदिर माध्यामिक प्रशाला कणकवली. व एस. एम. हास्कूल, कणकवली. नवी इमारत कणकवली कॉलेज कणकवली आणि जुनी इमारत कणकवली कॉलेज, कणकवली या चार उपकेंद्रावर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षंची वेळ सकाळी 11 ते दुपारी 12 असून परीक्षेस एकुण 1121 परीक्षार्थी प्रविष्ठ होणार होणार आहे.

          परीक्षेची बैठक व्यवस्था पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे. विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला,कणकवली येथे KD001001 ते KD001384  व एस. एस. हायस्कूल कणकवली येथे  KD002001 ते KD002336 तसेच कणकवली कॉलेज कणकवली (नवी इमारत) KD003001 ते KD003144 आणि कणकवली कॉलेज, कणकवली (जुनी इमारत) KD004001 ते KD004257   या  चार उपकेंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे.

          परीक्षेच्या आयोजनाबाबत उमेदवारांना महत्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे आहेत.

Ø  आयोगामार्फत आयोजित परीक्षामध्ये कॉपीचा, गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या घटनांची आयोगाकडून गंभीर दखल घेतली जाणार आहे.

Ø   अशा प्रकरणी आयोगाकडून संबंधितांवर फौजदारी व प्रशासकीय अशा दोन्ही स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे.

Ø   परीक्षांकरिता आयोगाने कडक उपाययोजना केलेल्या आहेत.

Ø  परीक्षा उपकेंद्रांवर उमेदवारांची आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेल्या सेवा पुरवठादार संस्थेच्या कर्मचाऱ्याकडून तपासणी (Frisking)करण्यात येणार आहे.

Ø  आयोगाकडून परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी विशेष निरीक्षक व भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या परीक्षेच्या जिल्हाधिकारी स्वत:पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार असल्याचे ही श्री. सोनोने  यांनी कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा