You are currently viewing आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाला पॅावर लिफ्टिंग स्पर्धेत तृतीय क्रमांक

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाला पॅावर लिफ्टिंग स्पर्धेत तृतीय क्रमांक

वैभववाडी

मुंबईत कर्जत येथे २५/०९/२०२२ रोजी झालेल्या विभाग स्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील मुलांच्या संघामधून कु. भूषण सुभाष कुबडे याची ९३ किलो वजनी गटामधून विद्यापीठ स्तरावर तृतीय क्रमांकाने निवड झाली . ही स्पर्धा मुंबई विद्यापीठ अंतर्गत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या ग्रामीण भागासाठी आयोजित केली होती. या स्पर्धेत इतर महाविद्यालयातून ११३ स्पर्धक सहभागी झाले होते . आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या कु.चेतन रवींद्र देसाई व भूषण सुभाष कुबडे या दोन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता, त्यामधून कु.भूषण सुभाष कुबडे याची विद्यापीठ स्तरावरती तृतीय क्रमांकावर निवड झाली. त्याला कॉलेजचे प्राचार्य डॉ. सी.एस.काकडे, क्रीडा प्रशिक्षक अशोक पाटील, क्रीडा विभाग प्रमुख प्रा.एस बी पाटील व सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले. संस्था पदाधिकारी, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा