महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठापैकी एक तुळजाभवानी देवी शक्ती पीठ आहें. तुळजाभवानी चें मंदिर तुळजापूर येथे आहें. बालाघाटतील एका डोंगरमाथ्यावर हे मंदिर आहें. त्यामुळे अगदी जवळ जाई पर्यंत या मंदिराचा कळस दिसत नाही. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानीस अग्रमान आहें. स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची ही कुलदेवता आहें.देवीच्या आशीर्वादाने स्वराज्य स्थापन करण्यासाठी शिवाजी महाराजांना प्रेरणा मिळाली. देवीने महाराजांना दृष्टांत दिला होता, महाराष्ट्रातील दुष्ट चक्रा चे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती. अशी अख्यायिका आहें. ही तलवार सध्या लंडन येथील संग्रहालयात आहें.
हे मंदिर महाराष्ट्रातील प्राचीन दंडकारण्यातील वनक्षेत्रात यमुनाचल पर्वतावर स्थित आहें. हे मंदिर स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना आहें. हे मंदिर हेमाडपणती आहें. या मंदिराला दोन महाकाय दरवाजे आहेत. या मंदिराच्या थोडे पुढे गेल्यानंतर कल्लोळ तीर्थस्थान आहें 108 तीर्थ्यांचे पवित्र तीर्थ स्थित आहें.त्या पुढे गोमूख तीर्थ आहें.
एका सुसंज्ज दरवाजातून प्रमुख कक्षात प्रवेश केल्या वर तेथे भवानी मातेची मूर्ती आहें.गरभगृहा जवळ एक चांदीचा पलंग आहें. ह्या ठिकाणी तुळजा भवानी निद्रा घेते असे मानले जाते. या पलंगाच्या विरुद्ध दिशेला महादेवाचे लिंग आहें. दुरून पाहिल्यावर असे वाटते की महादेव आणि भवानी माता समोरासमोर आहेत.
मंदिरात एक स्तंभ असून त्यावर चांदीचा छल्ला आहें. या छल्याला स्पर्श केल्यावर,शरीराचा एखादा अवयव दुखत असल्यास त्या अवयवातील वेदना थांबतात. असा अनुभव आहें.
कल्पना तेंडुलकर
ओरोस