You are currently viewing अखेर तीन वर्षानंतर क्यार चक्रीवादळात नुकसान झालेल्या मच्छीमारांना मदत मिळणार

अखेर तीन वर्षानंतर क्यार चक्रीवादळात नुकसान झालेल्या मच्छीमारांना मदत मिळणार

मच्छिमारांना आर्थिक मदत देण्याच्या बाबतीत मंत्री महोदय सकारात्मक; निलेश राणे यांची ट्विटरच्या माध्यमातून माहिती

 

सिंधुदुर्ग :

मुंबई येथे माजी खासदार निलेश राणे यांनी भाजपा नेते, कॅबिनेटमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. यावेळी ऑक्टोबर २०१९ साली झालेल्या क्यार चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला मोठा फटका बसला होता. कित्येक नौकाधारक तसेच पारंपरिक रापण संघ यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होतं मात्र तत्कालीन ठाकरे सरकार कडून आश्वासनाव्यतिरिक्त कुठल्याही ठोस स्वरूपाची मदत मच्छिमारांना झाली नव्हती.

ठाकरे सरकारने केवळ पंचनामे करून वेळ मारून नेली आणि मच्छिमारांना झुलवत ठेवलं. भाजपा नेते निलेश राणे यांनी मस्य विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन झालेल्या विशेष वैठकीत क्यार चक्रीवादळ नुकसानभरपाईच्या विषयात सविस्तर चर्चा केली. तसेच मच्छिमारांना आर्थिक मदत देण्याच्या बाबतीत मंत्री महोदय सकारात्मक असल्याची माहिती निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.

या चर्चेमुळे कोकणातील मच्छिमारांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून याचा फायदा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण ४१७६ रापण संघांना मिळणार आहे. एकट्या मालवण तालुक्यातील यात १९४ रापणसंघ आहेत जे गेली तीन वर्षे मदतीच्या प्रतीक्षेत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + eleven =