You are currently viewing भंडारी समाज विकास मंडळ भांडुप आयोजित समारंभात खासदार मनोज कोटक यांचे भागोजी कीर यांच्या स्मारकासाठी सर्वतोपरी आश्वासन

भंडारी समाज विकास मंडळ भांडुप आयोजित समारंभात खासदार मनोज कोटक यांचे भागोजी कीर यांच्या स्मारकासाठी सर्वतोपरी आश्वासन

मुंबई –

“मी फक्त पन्नास टक्केच काम केले असून भंडारी समाजाच्या शाळेचे कामही पूर्ण करून देणार हा माझा शब्द असून; कागदावरचे काम करत नसून माझ्या कामाने प्रत्यक्षात कामकाज घडवून आणतो. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी दादर मधील स्मशानभूमीची जागा दानशूर भागोजी कीर यांनी ९ एकर जमीन विकत घेऊन दिली. याचा उल्लेख झाला. तोच धागा पकडून त्याचं जागेवर त्यांचे स्मारक बांधून द्यावे अशी मागणी केली होती. त्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू.” असे आश्वासन उद्घाटनप्रसंगी खासदार मनोज कोटक यांनी भंडारी समाज विकास मंडळ, रामनगर भांडुप पश्चिम येथे आयोजित भंडारी समाजाचे आधारवड भागोजी कीर यांच्या प्रतिमेचे पूजन करताना सूचित केले. भंडारी समाज विकास मंडळ अध्यक्ष विनोद चव्हाण यांनी स्वराज्याचे पहिले आरमार अस्मिता म्हणजे मायनाथ भंडारी जिथे जिथे खाडी, समुद्र किनारा आहे. तिथं तिथं भंडारी समाज वाडया वस्त्यांवर विखुरलेला आहे. त्यांनी तिथे स्वसंरक्षणासाठी काम केले. भंडारी कोण ? हे भंडारी समाजाला माहिती असणे आवश्यक असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमासाठी भांडुपस्थित माजी आमदार अशोक पाटील, श्याम सावंत, भाजपा भांडुप विभाग अध्यक्षा निकिता घाडीगांवकर, समाजसेवक भास्कर विचारे , कौशिक पाटील, संजय शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सिनेकलावंत अंशुमन विचारे, प्रार्थना बेहेरे यांची खास उपस्थिती लक्ष वेधून घेत होती. भंडारी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावून भागोजी कीर यांच्या स्मरणातील समाज घडविण्यासाठी प्रयत्न करूया असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यानिमित्ताने श्री सत्यनारायण महापूजा आणि महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. रंगतदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुश्मिता तोडणकर यांनी केले. तर गुरूनाथ मिठबावकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. सचिव प्रफुल्लकांत वाईरकर, खजिनदार जी. एन. बादवलकर आणि सहकारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × two =