*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखीत अप्रतिम लेख*
*मनोगत*
*वसुंधरेस…..*
आजबोलायचं तुला…. कारण रोजच्या सहवासात जरी असले तरी भावना व्यक्त करायला शब्दांचा आधार लागतो.
तू आम्हाला जन्मापासून तर अखेरपर्यंत केलेले ऋण व्यक्त करण्यास ओळीच हव्या.!
काय दिलं नाही आम्हाला तू…!
जन्मलो की उभं रहायला धरणी,
प्राणवायू साठी,सावली देणारे भले थोरले वृक्ष, हिरवेगार रान,अन्नधान्याला काळी कसदार जमीन…आश्रयाचं,विसाव्यासाठी असणारं घर,झोपडीदेखील तुझ्यातील वस्तूंचीच!
अनंतहस्ते तू देतच राहिली.
आईपण सिध्द केलंस..
पण आम्ही मानव उपकार न जाणता लोभ ,मोहात कधी पडू लागलो कळलंच नाही. खूप अपराधी वाटतंय आता.भरभरून दिलेल्या खनीजासाठी प्रचंड खड्डे खोदले उदरात..पहाड फोडून विद्रूप केले.विकासाच्या नावाखाली
मोठमोठे वृक्षराज तोडून भुईसपाट केले.त्या कापलेल्या फांद्या बघून तुला किती दुःख झाले असेल.पण लोभांध माणसाला कसे दिसणार ते,
नद्यांचे खळाळ वाहणारे पाणी अडले,ओढे तुंबले..प्रचंड हानी केली तुझी..प्लास्टिक वापर वाढला,रसायनांनी जमीन,पाणी,हवा , वातावरण दूषित केलं…आता त्याचे परिणाम जाणवत आहे.तापमान वाढ,प्रदूषण, नैसर्गिक संकटं ओढवून घेतली माणसाने.
वसुंधरे क्षमा करशील ना..
काहीजण तुझ्या रक्षणासाठी झटून प्रयत्न करत आहेत.पूर्वी देवराई होती.देवाच्या नावामुळे जंगल सुरक्षित असायचे.कोणी काडीलाही हात लावत नसत,देवराईतील आदिवासी खरे भूमी,वनरक्षक.झाडावरची फळे,ओल्या फांद्या ते कधी तोडत नाहीत.चिपको आंदोलनात किती महिला सहभागी आणि बहुगुणांनी तर सुंदरबन गढवाल मधे वृक्ष वाचवण्यासाठी ,लागवडीसाठीमोहीमच केली.
बरेच जण पर्यावरण जागृतीसाठी झटत आहेत.नवीन वृक्ष लावून झाडे लावा,झाडे जगवा सांगत आहेत.
तुझ्या वर या लेकरांनी केलेल्या
अन्यायासाठी मनःपूर्वक माफी मागते.
तुझं अंतःकरण उदार आहे.क्षमाशीलता आहे तुझ्यात.
अंतःकरणातून व्यक्त झाले,खूप
समाधान वाटतं.तुझी कृपादृष्टी
सदैव राहू दे.जास्त काय.तू जाणून आहेसच.आई ना आमची….!
अरूणा दुद्दलवार
दिग्रस……यवतमाळ
🍃🍃🥀🍃🍃🌹🍃🍃🥀🌹
Advertisement
*⚛️प्रवेश मार्गदर्शन सुरू⚛️*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*_🥳१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…👩💻_*
*🛑उपलब्ध शिक्षणक्रम:-*
🔸बी. ए.
🔹बी. कॉम.
🔸एम. कॉम.
🔹एम. बी. ए.
🔸रूग्ण सहायक
🔹एम.ए. (अर्थशास्त्र)
🔸एम.ए. (लोक प्रशासन)
🔹एम.ए. (इंग्लिश)
🔸एम.ए. (हिंदी)
*# सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र #*
*📜प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-👇*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर*
*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*
*📲मोबा. 8605992334*
*Web link*