You are currently viewing माझी सप्तश्रुंगी आई

माझी सप्तश्रुंगी आई

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी यश सोनार लिखीत अप्रतिम काव्यरचना*

*माझी सप्तश्रुंगी आई*

वणीच्या गडाला गडाला
तीचा निवास आहे
डोंगराच्या कडेला कडेला
तीच देऊळ आहे

चला नांदूरी गडाला गडाला
तिथे राहते माझी आई…

माझी सप्तश्रुंगी आई…
माझी सप्तश्रुंगी आई!

आई तुझ्या दर्शनाला..
आले सारे पायी पायी!

माझी सप्तश्रुंगी आई
माझी सप्तश्रुंगी आई!

माझी सप्तश्रुंगी आई
ग माझी सप्तश्रुंगी आई
माझी सप्तश्रुंगी आई
ग माझी सप्तश्रुंगी आई!! ध्रु!!

प्रसन्न चित्त मुख तुझे
आई सदैव मी पाही
आम्ही लेकरं ग तुझी
भाव चरणी तुझ्या वाही

दर्शन तुझे आई..
आम्हा सत्वर होई

माझी सप्तश्रुंगी आई
माझे सप्तश्रुंगी आई!! १!!

माझ्या खांदेशाची तु आई
तुझ्या दर्शनाला नित्य मी येई
नवरात्रीचा तुझा हा सोहळा
आम्ही डोळे भरून तो पाही

डोंगरावर आई..
माझी सदैव राही..

माझी सप्तश्रुंगी आई
माझी सप्तश्रुंगी आई!! २!!

ये अंबा भवानी आई
ये तुळजाभवानी आई..

अहो माहूराची रेणुका
ही रेणुका माझी आई..

कोल्हापूरची लक्ष्मी
ही लक्ष्मी माझी आई….

आई भवानी तू…..
तु माझी सप्तश्रुंगी आई!

माझी सप्तश्रुंगी आई!
माझी सप्तश्रुंगी आई!

माझी सप्तश्रुंगी आई
ग माझी सप्तश्रुंगी आई
माझी सप्तश्रुंगी आई
ग माझी सप्तश्रुंगी आई!! ध्रु!!

प्रतिक्रिया व्यक्त करा