You are currently viewing जोगवा

जोगवा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य…. लालित्य नक्षत्रवेल…. शब्दांकुर समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*जोगवा*

आई उदो गं उदो अंबाबाईचा
जोगवा मागते मागते भवानीचा..

नतमस्तक तुझिया चरणी
दे मज भक्तीची ओवाळणी
डोळे भरून पाहता पाहता
लागे लळा तुझ्या भक्तीचा
आई उदो गं उदो अंबाबाईचा

अगणित खांबावरी मंदिर
भक्तांना देते तू साक्षात्कार
अपरंपार गं महिमा महिमा
ठेविला हात आशीर्वादाचा
आई उदो गं उदो अंबाबाईचा

पडती सूर्यकिरणे चरणापाशी
म्हणती दक्षिणेची तुज काशी
चित्त होतंय प्रसन्न प्रसन्न
स्पर्श होता तुझ्या पायरीचा
आई उदो गं उदो अंबाबाईचा

येतो गं मनोभावे दर्शनाला
दूर कर जगीच्या संकटाला
तुझा आधार वाटतो वाटतो
म्हणुनी लाभ घेतो भेटण्याचा
आई उदो गं उदो अंबाबाईचा
जोगवा मागते मागते भवानीचा

(दीपी)
दीपक पटेकर, सावंतवाडी

प्रतिक्रिया व्यक्त करा