काँग्रेस चे माजी खासदार अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर आणि काँग्रेसचे खासदार जेष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी चिपी विमानतळाला बॅ. नाथ पै यांचे नांव देण्याची मागणी केली होती, याची तातडीने दखल घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत चिपी विमानतळाला बॅ. नाथ पै यांचे नांव देण्याचा निर्णय घेतल्या बद्दल सरकारचे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने आम्ही आभारी आहोत, असे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी म्हटले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याची कार्यवाही सरकारने करावी अशी मागणी इर्शाद शेख यांनी केली आहे.