सप्तश्रुंगी देवी ही वणी नाशिक जिल्ह्यात स्थित आहे. भागवत आणि दुर्गा सप्तशतीत याचा उल्लेख आढळतो. एकूण 108 शक्तिपीठापैकी आणि महाराष्ट्रातील साडे तीन शक्तिपीठ पैकी एक आहे. ही देवी मुलशक्तिपीठ असून बाकी कोल्हापूर ची महालक्ष्मी, तुळजापूर ची तुळजा भवानी, माहुरची रेणुका देवी आहेत. सप्तश्रुंगी हा गाडी नांदुरी या गावात आहे. येथील अनेक कुटुंबाचे हे आराध्य दैवत आहे. देवीचे हे रूपं अष्टभुजा असे आहे. ब्रह्म देवाच्या कमंडलू पासून निघालेल्या गिरीजा या महानदीचे चें रूप सप्तश्रुंग मानले जाते. ही देवींची मूर्ती स्वयंभु आहे. मंदिराच्या गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्याद्वार, चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत. या तीनही दरवाजातून देवीचे दर्शन घडते. या मंदिरात दरवर्षी शा कमभरी देवीचा नवरात्र उत्सव साजरा केला जातो. श्री देवी आईचा मेकअप फळांनी आणि भाज्यांनी केला जातो. शाकमभरी देवीचे मुख्य मंदिर उत्तर प्रदेशात सहारणपूर येथे आहे.
सप्तश्रुंगी देवींची मूर्ती 9 फूट आहे ही मूर्ती शेंदुराने लिंपली आहे. अलीकडेच या मूर्तिवरचा शेंदूर काढण्यात आला तो वजनाने 1100 किलो. भरला.यात देवीचे दोन फोटो दिले आहेत. शेंदूर काढण्यापूर्वीचा आणि शेंदूर काढल्या नंतरचा. शेंदूर काढल्या नंतर देवीचे खरे मुलं स्वरूप अगदी लोभसवाने दिसत आहे. यात देवीच्या प्रत्येक हातात वेगवेगळी आयुधे दिसत आहेत. देवीला 11 वार पैठणी किंवा शालू परिधान करण्यासाठी लागतो तसेच 4 वारं खण लागतो. देवीच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट, नाकात सोन्याची नथ,कानात कर्ण फुल,, गळ्यात मंगळसूत्र, पुतळ्यांचे गाठले पायात तोरड्या, असे अलंकार घातले जातात.
दंडकारण्यात जेव्हा राम सीता वनवसात होते तेव्हा त्यांनी देवीचे दर्शन घेतले होते, असा पौराणिक कथानं मध्ये आढळतो. लिळा चरित्रमध्ये असा उल्लेख आढळतो की, राम व रावण युद्धात इंद्रजीत लक्षुमनाला बेहोष करतो त्यावेळी संजीवनी वनस्पती आणण्यासाठी हनुमंत द्रोणागिरी पर्वत उचलून आणतात. त्यावेळी त्याचा एक तुकडा पडला तो म्हणजेच सप्तश्रुंगी गाडी होय.. नवनाथ भक्तीसारामध्ये या देवीचा उल्लेख असून शाबरी विद्येची सुरवात येथूनच झाली. सुरत लुटल्या नंतर शिवाजी महाराजांनी या देवीचे दर्शन घेतले असें इतिहासकार म्हणतात. चैत्रापौर्णिमेला खूप मोठी जत्रा या ठिकाणी भरते. देवीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक दरवर्षी येथे भेट देतात.
गडावर चढून जाण्यासाठी 472पायऱ्या आहेत. एका बाजूने चढता येते. व गडाच्या दुसऱ्या बाजूने उतरताना येते. आता त्या ठिकाणी रोप वे ची डियो करण्यात आली आहे. पर्यटकासाठी. धर्मशाला बांधण्यात आल्या आहेत.
देवीचे मंदिर पहाटे पाच वाजता उघडते. सहा वाजता काकड आरती होते. आठ वाजता महापुजेस सुरवात होते.शालू किंवा पैठणी नेसवली जाते. दुपारी 12 वाजता आरती आणि महाप्रसाद होतो. संध्याकाळी साडेसात वाजता शेजारती होते नंतर मंदिरा चें दरवाजे बंद केले जातात. देवीला पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवतात, त्या बरोबर खुरास्नीची चटणी आणि भाजी पोळीचा पण नैवेध्य दाखवतात. येथील पूजेचा मान देशमुख व दीक्षित घराण्या कडे आहे.
कल्पना तेंडुलकर
ओरोस