You are currently viewing माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

सिंधुदुर्गनगरी

 नवरात्री उत्सवानिमित्त 18 वर्षावरील महिलांच्या आरोग्य तपासणी करिता दि.26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर  या नऊ दिवसांच्या कालावधीत माता सुरक्षित तर घर सुरक्षित या विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ  जिल्हाधिकारी के .मंजुलक्ष्मी  यांच्या हस्ते करण्यात आला.

            जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे,  निवासी वैद्यकीय अधिकारी ( बाह्य संपर्क) अधिकारी  डॉ. सुबोध इंगळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ शाम पाटील, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. सई धुरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संदेश कांबळे, सर्व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            या अभियानाची सुरुवात झाल्यानंतर  मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नयार  यांचे हस्ते जिल्हातील पहिल्या आरोग्य शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. या निमित्ताने शुश्रुषा प्रशिक्षण महाविद्यालय येथील प्रशिक्षणार्थींनी सुरक्षित मातृत्व हे  पथनाट्य सादर केले.

            या आरोग्य शिबीराचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य विर्धिनी केंद्र या ठिकाणी करण्यात आलेले आहे. या आरोग्य  शिबीरांमध्ये 18 वर्षे वयोगटावरील सर्व महिलांचे आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीमध्ये उंची व वजनाचे मोजमाप, रक्तदाब तपासणी हिमोग्लोबिन व इतर तपासणी  रक्त गट, टि.डी. व कोविड लसीकरण, आर्यन  फोलिक ॲसिड  व कॅल्शिअम गोळ्यांच्या पुरक मात्रांचे वितरण करणे, पोषण, स्तनपान, प्रसुतीची अति जोखमीची लक्षणे याबाबत प्रसृत होणाऱ्या मातांना तज्ज्ञाकर्वी समुपदेशन करणे. अतिजोखमीच्या मातांना जवळच्या प्रथम संदर्भ सेवा केंद्रात पाठवून स्त्रिरोग तज्ज्ञामार्फत तपासणी करुन उपचार सुरु करणे. 7 ग्रम पेक्षा कमी हिमोग्लोबीन असणाऱ्या गरोदर मातांना आर्यन सुक्रोजचे डोस रुग्णालयात देणे. किशोरवयीन मुलींमधील गर्भधारणा रोखणे, तंबाखू व मद्यमान सेवानामुळे गर्भधारणेस होणारे धोके, प्रसृती कालावधीतील व नंतरच्या संतुलित आहार या सर्वाबद्दल माहिती देणे. 30 वर्षावरील महिला उच्चरक्तदाब, मधुमेह यांची तपासणी करुन उपचार करणे. महिलांचे दंत आरोग्य तपासणी करणे, तंबाखूपान, गुटखा, मादक पदार्थ सिगरेट सारख्या व्यसनापासून मौखिक आरोग्यावर होणारे परिणाम याविषयक माहिती देवून  सदरची व्यसने बंद करण्यासाठी समुपदेशन करणे. कर्करोग निदानासाठी तपासण्या करणे. 60 वर्षावरील महिलांचे डोळे तपासणे, कर्क बधीरता तपासणे, व वृध्दापकाळासंबंधी आजार विषयक तपासण्या करणे. प्रसूती होणाऱ्या महिलांच्या सोनोग्राफी तपासण्या करणे. एच.एच.एल लॅबोरेटरी सेवेमार्फत स्त्रिायांच्या, प्रसुती मातांच्या विशेष  तपासण्या करुन घेणे. जननी सुरक्षा योजना व प्रधानमंत्री योजना या योजनांचा लाभ मिळण्यासाठी आधार कार्ड लिंक कॅम्प करणे, अशा प्रकारे 18 वर्षे वयांवरील महिलांना आरोग्य विषयक सेवा सुविधा देण्याकरिता आरोग्य शिबीरांचे आयोजन केले असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी सांगितले. आहे. कार्यक्रमाचे सुत्र संचालन तेजस्वीनी गायडोळे व आभार प्रदर्शन एस. आर. प्रभु  यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा