You are currently viewing स्कुबा डायविंग’ साठी एक दर एक खिडकी

स्कुबा डायविंग’ साठी एक दर एक खिडकी

मालवण बंदर जेटी येथे १ ऑक्टोबरला शुभारंभ ; जेष्ठ पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर यांची माहिती

मालवण

बंदर विभागाने केलेल्या आवाहनानुसार मालवण बंदर जेटी येथे १ ऑक्टोबर पासून एक खिडकी माध्यमातून स्कुबा डायविंग सुरू केले जाणार आहे. मालवणातील सर्व व्यवसायिकांनी या एक खडकीत सहभागी व्हावे. असे आवाहन जेष्ठ पर्यटन व्यवसायिक दामोदर तोडणकर यांनी केले आहे.

मालवण बंदर जेटी येथील निवासस्थानी तोडणकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. किनारपट्टीवर पर्यटन हंगाम बहरत असताना अधिकृत, अनधिकृत यावरून होणारे वाद तसेच एखाद्या व्यवसायिकास टारगेट करणे ही भूमिका चुकीची आहे. मालवणात सागरी पर्यटनाचा पाया ज्यांनी रोवला त्यापैकी मी एक आहे. मालवणचे पर्यटन वाढावे हाच आपला प्रमुख हेतू असून त्यासाठी जर एक समान दर निश्चिती होऊन एक खिडकी होण्यासाठी बंदर विभाग पुढाकार घेत असेल तर ते स्वागतार्ह आहे. मात्र, किनारपट्टीवर एक दर व एकच खिडकी असावी व ती बंदर जेटी येथेच असावे हिच आपली भूमिका आहे. त्याच उद्देशाने 1 ऑकटोबर पासून एक खिडकी व एक दर स्कुबा डायव्हिंग सुरु केले जाणार आहेत. वॉटर स्पोर्ट्स व परसिलिंग व्यवसायिक एकत्र येत असतील तर त्यांचेही स्वागत आहे. बंदर विभागाने निश्चित केलेले दर यानुसारच जलक्रिडा व्यवसाय सुरु केले जाणार आहेत.

यापूर्वीही एक खिडकीसाठी प्रयत्न झाले. मात्र, ते बंद झाले. आता काही कडक नियम बंदर विभागाने घालून दिले आहेत. त्याचेही स्वागत आहे असेही दामोदर तोडणकर यांनी सांगितले.

नाहक आरोप होत असतील तर गप्प बसणार नाही

अनधिकृत अनधिकृत म्हणून जर कोणी आरोप करत असतील तर गप्प बसणार नाही. माझ्या नव्या बोटींनाही बंदर विभागाकडून नंबर प्राप्त झाले आहेत. अन्य प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरु आहेत. अशा स्थितीत माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी यापूर्वी मी ज्यांना जो व्यवसाय दिला, त्याचे आत्मचिंतन करावे असे तोडणकर यांनी या निमित्ताने सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा