*असंख्य शिवसैनिकांनी केला जाहीर प्रवेश*
कणकवली :
घटस्थापनेच्या मुहूर्तावर कणकवली मालवण तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय आंग्रे, माजी सभापती संदेश पाटील, माजी नगरसेवक भूषण परूळेकर, भास्कर राणे, बबन शिंदे, विलास साळसकर, शेखर राणे, सुनील पारकर उपस्थित होते. मालवण तालुक्यातील किर्लोस, शिरवंडे, अजगणी तसेच कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावातील १०० हून अधिक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती. माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी, युवक, युवतींचा समावेश यावेळी होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला सिंधुदुर्गातील दोन हजार कार्यकर्ते जाणार असे अशी माहितीही ब्रिगेडियर सावंत यांनी दिली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न मार्गी लागतील याची खात्री आहे. केवळ भौतिक सुविधा म्हणजे विकास नव्हे, तर शेतकऱ्यांचा विकास आणि युवक युवतींच्या हाताला रोजगार म्हणजे खरा विकास होईल. माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत हे कृषी क्षेत्राच्या माध्यमातून शाश्वत विकासासाठी झटत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आपण आज शिंदे गटात सामील होत असल्याचे प्रवेश कर्त्यांनी सांगितले.