You are currently viewing दत्त विद्यामंदिर वैभववाडी येथे राष्ट्रीय पोषण उपक्रम उत्साहात साजरा

दत्त विद्यामंदिर वैभववाडी येथे राष्ट्रीय पोषण उपक्रम उत्साहात साजरा

बांदा

दत्त विद्यामंदिर,वैभववाडी शाळेत राष्ट्रीय पोषण महिना उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पौष्टिक खाद्यपदार्थांचा आस्वाद देण्यात आला..बदलत्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा तसेच इतर आजार उद् भवतात…ते आजार होऊ नये म्हणून विद्यार्थांनी कोणता पौष्टिक आहार घ्यावा,व्यायाम..इ. बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला दत्त विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका पाटील मॅडम,सावंत मॅडम,साठे मॅडम ,श्री. पाडदेवाड सर तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस ,पालक,ग्रामस्थ उपस्थित होते..या उपक्रमासाठी केंद्रप्रमुख जाधव सर,शालेय पोषण आहार अधिषक वडर सर ,गटशिक्षणाधिकारी शिनगारे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा