You are currently viewing खासदार सुप्रिया सुळेंच्या फोटोत बदल करणाऱ्यांवर कारवाई करा – सिंधुदुर्ग युवती राष्ट्रवादी तर्फे सावंतवाडी पोलिसांना निवेदन सादर

खासदार सुप्रिया सुळेंच्या फोटोत बदल करणाऱ्यांवर कारवाई करा – सिंधुदुर्ग युवती राष्ट्रवादी तर्फे सावंतवाडी पोलिसांना निवेदन सादर

सावंतवाडी

खासदार सुप्रिया सुळे यांच्या फोटोत बदल करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिंदे गटाच्या नगरसेविका शितल म्हात्रे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आज सिंधुदुर्ग युवती राष्ट्रवादीकडून सावंतवाडी पोलिसांकडे करण्यात आली. याबाबतचे निवेदन पोलिसांना देण्यात आले.

शिंदे गटाच्या नगरसेविका शितल म्हात्रे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या फेसबुक पेजवरील प्रोफाईल फोटोचे इडीटींग करून खासदार सुप्रिया सुळे ह्या मुख्यमंत्री महोदयांच्या खुर्चीवर बसल्याचे दाखवत असलेला फोटो फेसबुक पेजवर पोस्ट केला होता. यामागे सुळे यांची प्रतिमा मलीन करणे व त्यांची बदनामी करणे हाच त्यांचा हेतू आहे. समाजामध्ये बदनामीकारक माहिती पसरविणाऱ्या अश्या व्यक्तींवर त्वरित कारवाई व्हावी, याकरिता सिंधुदुर्ग जिल्हा युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष सावली पाटकर यांनी सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांना निवेदन दिले.

यावेळी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, रत्नागिरी महिला निरीक्षक दर्शना बाबर देसाई, शहर महिला शहराध्यक्ष सायली दुभाषी, तालुका चिटणीस बाबल्या दुभाषी, महिला तालुका अध्यक्ष रिद्धी परब, सौ. पूजा दळवी, तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल, तालुका उपाध्यक्ष राकेश नेवगी, संजय नाईक आदी उपस्थित होते.

यापुढे असे प्रकार घडल्यास युवती राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा पाटकर यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा