You are currently viewing स्वप्न वेडी धूंद रात्र सरली

स्वप्न वेडी धूंद रात्र सरली

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच…पारिजात साहित्य समूह सदस्या लेखिका कवयित्री अनिसा सिकंदर यांची अप्रतिम गीत रचना*

*स्वप्न वेडी धूंद रात्र सरली*

स्वप्न वेडी धूंद रात्र सरली
फक्त आठवांची साथ उरली॥धृ॥

तुझ्या सोबतीने मी बहरली
तुझ्या प्रेम रसात होते न्हाली
आनंदाची होती जीवन वेली
स्वप्न वेडी धूंद रात्र सरली॥१॥

उठले ते तूफान भोवताली
सगळीच घडी विसकटली
बाग बहरली होती आपली
स्वप्न वेडी धूंद रात्र सरली॥२॥

हातातिल हात हा निसटला
गंध रातराणीचा मावळला
तुला भेटण्यास मी असुसली
स्वप्न वेडी धूंद रात्र सरली॥३॥

चाहुल तुझी जाणवते मला
मागे पुढे असतो सोबतीला
अंतर मनाने मीॅ सुखावली
धूंदवेडी धूंद रात्र सरली॥४॥

अनिसा सिकंदर
दौंड पुणे
९२७००५५६६६

प्रतिक्रिया व्यक्त करा