You are currently viewing पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना वेंगुर्ले मधुन केंद्र सरकारच्या लाभार्थ्यांनी पाठविली आभार पत्रे

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना वेंगुर्ले मधुन केंद्र सरकारच्या लाभार्थ्यांनी पाठविली आभार पत्रे

वेंगुर्ले

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी आठ वर्षाच्या आपल्या कार्यकालात सर्व सामान्य जनतेला विवीध योजनांच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळवून दिला . त्यामुळे गोरगरिबांना त्याचा फायदा झाला . अनेक निराधार कुटुंबाना आपल्या हक्काचे घर मिळाले , तर बाहेर शौचास जाणारयांना स्वतःचे शौचालय मिळाले , गरीब महिलांना जेवन बनवताना धुरातुन मुक्तता मिळाली व उज्वला योजनेतून मोफत गॅस कनेक्षन मिळाले , कित्येक वर्षे काळोखात रहाणारया कुटुंबाना सौभाग्य योजनेतून मोफत विज कनेक्षन मिळाले , आरोग्याच्या बाबतीत आयुष्यमान भारत योजनेतून पाच लाखापर्यंत मदत मिळाली तर शेतकरयांना शेतकरी सन्मान योजनेतून दर तीन महिन्यांनी खात्यात पैसे जमा होऊ लागले , तसेच गरीब कुटुंबाना मोफत धान्य मीळाले . अशा प्रकारे देशातील प्रत्येक कुटुंबाला वेगवेगळ्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी मदत केली .
अशा लाभार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांचे आभार मानले व अशी आभार पत्रे भाजपा कार्यालयात आणुन दिली .
कार्यालयात जमा झालेली पत्रे वेंगुर्लेतील मुख्य पोस्ट ऑफिस मध्ये नेऊन पत्रपेटीत टाकण्यात आली . यावेळी जिल्हा सरचिटणीस तथा सेवा पंधरवडा जिल्हा संयोजक प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर , जिल्हा का.का.सदस्य साईप्रसाद नाईक , नगरसेविका श्रेया मयेकर , अल्पसंख्याक सेलच्या हसीनाबेन मकानदार , महिला मोर्चाच्या रसीका मठकर , दुर्वा दिपक माडकर , उद्योजक अंबरीश मांजरेकर , मच्छीमार सेलचे दादा केळुसकर , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस , शशिकांत करंगुटकर , बुथप्रमुख रुपेश माडकर , शालिनी सिताराम चिपकर , जितेंद्र जाधव , नेहा पालयेकर , तृप्ती आरोलकर , समृद्धी बांदेकर इत्यादी लाभार्थी उपस्थित होते .
यावेळी उज्वला गॅस योजना , पी.एम.स्वनीधी योजना , आरोग्य बीमा योजना , पंतप्रधान आवास योजना , जनधन योजना , पी.एम.किसान योजना , गरीब कल्याण योजनांचे लाभार्थी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा