You are currently viewing सौर कृषी पंप बाबत असलेल्या त्रुटींचे निराकरण करा

सौर कृषी पंप बाबत असलेल्या त्रुटींचे निराकरण करा

कणकवली राष्ट्रवादीतर्फे महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन सादर

कणकवली

महाराष्ट्रात संपूर्ण सौर कृषी पंप योजनेमार्फत शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत. कृषी अधिकारी व महावितरण यांचे मार्फत कृषी पंप जोडणी केली जाते. सिंधुदुर्गातील काही शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत सौर कृषी पंप जोडणी केलेली आहे. या योजनेत काही त्रुटी दिसून येत आहेत.

योजनेनुसार संबंधितांना लाईट कनेक्शन काढून टाकावे लागते; जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार या पंपातून पुरेसे पाणी सक्षम होत नाही आणि वीज कनेक्शन नसल्यामुळे दुसरा पर्याय पण राहत नाही. त्यामुळे शेतकरी समस्याग्रस्त झाले आहेत.

या विषयास अनुसरून शेतकऱ्यांनी आपल्या विभागात तक्रारी पण दाखल केल्या आहेत. परंतु त्याची दखल घेतलेली नाही. शेतकऱ्यांची अवस्था तेलही गेले, तूपही गेले, हाती आले धुपाटणे अशी झाली आहे. तरी कणकवली महावितरणचे कार्यकारी अधिकारी म्हणून या समस्येचे निराकरण करण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी राष्ट्रवादी कृषी सिंधुदुर्ग सेल अध्यक्ष समीर आचरेकर यांनी निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता महावितरण सिंधुदुर्ग कणकवली यांना केली आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, युवक जिल्हा चिटणीस सागर वारंग, शहर युवक अध्यक्ष संदेश मयेकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा