*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री प्रज्ञा कुलकर्णी लिखीत चौदाखडीची कविता*
*चौदाखडी*
अ आ इ ई उ ऊ ए ॲ ऐ ओ ऑ औ अं अ:
अ – अननसाची चव असते आंबड गोड
आ – आवडते बाळाला माझ्या फळाची फोड
इ – इडलिंबू चा रंग असतो किती किती मोहक
ई – ईश्वर आपले असतात जन्माचे हो चालक
उ – उत्तरायण दक्षिणायनाची मिळवायची हं माहिती
ऊ- ऊस लागवड करतात बरं गूळ साखरेसाठी
ए – एकोप्याने वागून बाजू समजुया नात्यांच्या
ॲ – ॲक्शन ला रियाक्शन प्रत्येकाच्या वाट्याच्या
ऐ – ऐटीत वागण्याची असते बहारदार शैली
ओ -ओतप्रोत भरत राहो धन धान्याची पायली
ऑ – ऑगस्ट मध्ये येतो देशाचा स्वातंत्र्य दिन
औ – औषधी नकोत तर व्यायामाची धरावी वीण
अं – अंदाजाने नको कधीच, वाचून सांगावे उत्तर
अ: – अ: हा. हा..चौदाखडीचा हा वाडा आमचा सुंदर
_सौ.प्रज्ञा कुलकर्णी_
_#राज्ञी_