*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ आदिती मसुरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*🌹आरोग्य परी🌹*
सुदृढ बालक आहेत
भारत देशाची शान
पोषक आहार घेऊन
होतील गुटगुटीत छान
पालक , मुळा, माठ, शेपू
हिख्या पालेभाजा छान
जेवणाच्या ताटात आहे
पहिला त्यांचा मान
नाश्त्यासाठी करा तुम्ही
नाचणी तांदळाचे घावन
अन्नपूर्णा माता होईल
तुमच्यावर सदा पावन
पिझ्झा बर्गर मॅगीला
कायमचे करा टाटा
चणे, फुटाणे , शेंगदाणे
नियमित मुलांना वाटा
मेथी अन् मुगाचे
खाल पौष्टिक लाडू
कुपोषीत बालकांचे
वजन लागेल वाढू
बीट, गाजर, काकडीची
चवदार कोशिंबीर
आजारांशी लढण्यासाठी
करेल तुम्हाला खंबीर
गोड पपई आंब्याची
चव तुम्ही चाखा
फळांशी मैत्री करून
आरोग्य आपले राखा.
*✒️© सौ आदिती धोंडी मसुरकर*
*कुडाळ सिंधुदुर्ग*