You are currently viewing आभाळ दाटलेले

आभाळ दाटलेले

*मनस्पर्शी साहित्य परिवार सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री माया कारगिरवार लिखित अप्रतिम गीत रचना*

 

*आभाळ दाटलेले*

 

कां पापण्यात आभाळ असे दाटले

आज मनातलं बोलावं ,खुप वाटले ।।धृ।।

 

भावनांचा पूर वाहे लोचनी ,

पापणीचे काठ होई ओले

येऊन आठवांचा गहिवर

हृदयी माझ्या कां गुज दाटले

आज मनातलं बोलावं खुप वाटले …।।१।।

कां उदासी दाटून आली ,

आयुष्य असे निसटून जातांना

मी मलाच चुकवीत होते

स्वप्नी साद तू घालतांना

स्वप्नवेडे भास माझे येथे साठले

आज मनातलं बोलावं खुप वाटले ।।२।।

 

फुलूनआलेल्या नात्याचा

बहर आहे तसाच राहू दे

सांज झाल्यावेळेत आता

रातराणी पुन्हा दरवळू दे

कोणासाठी रंग निळे हे

दाटले ..?

आज मनातलं बोलावं खुप वाटले …।।३।।

 

सौ.माया कारगिरवार

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + seventeen =