अमरावती
12 वी नंतर आयएएस किंवा इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अमरावतीच्या डाँ. पंजाबराव देशमुख अकादमीने मिशन आयएएस अंतर्गत येत्या 11 ऑक्टोबरपासून शीतकालीन स्पर्धा परीक्षा शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून दिल्ली येथील मालुका आयएएस अकादमीचे मार्गदर्शक व तज्ञ मार्गदर्शक श्री प्रशांत भाग्यवंत यांना निमंत्रित करण्यात आले आहे. बारावीच्या परीक्षेपासून आयएएसच्या परीक्षेला सुरुवात केली तर विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये लवकर यश मिळू शकते हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरास सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी डॉ.पंजाबराव देशमुख अकादमीचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांना 9890967003 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अकादमीच्या प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आलेले आहे .या शिबिरामध्ये श्री प्रशांत भाग्यवंत यांच्याशिवाय आयएएस क्षेत्रातील विविध तज्ञ तसेच काही आयएएस आयपीएस आय आर एस तसेच सनदी व राजपत्रित अधिकारी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी ही महाराष्ट्रातील प्रतिष्ठित अकादमी असून या अकादमी मार्फत फक्त एक रुपयामध्ये आयएएसचे प्रशिक्षण देण्यात येते .अशा प्रकारचे प्रशिक्षण देणारी ही भारतातील एकमेव अकादमी आहे. या अकादमीला आतापर्यंत 350 सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांनी भेट दिल्या असून ही अकादमी गेल्या 22 वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रंथालय अभ्यासिका व मार्गदर्शन विनामूल्य उपलब्ध करून देते. विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन अकादमीच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रकाशनार्थ प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी .अमरावती.