सावंतवाडी
इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी यांच्यामार्फत भोसले नॉलेज सिटी येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आलेल्या कॅन्सर डायग्नोसिस आणि प्रिवेंशन अँड मॅनेजमेंट या चर्चा सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. इनरव्हील क्लबच्या या उपक्रमाचा लाभ ४०० विद्यार्थिनींनी लाभ घेतला.
यावेळी व्यासपिठावर सावंतवाडीतील प्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ डॉ राजेश नवांगुळ, स्त्रीरोग तज्ञ डॉ नेत्रा सावंत, यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजचे प्राचार्य विजय जगताप, इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्या अध्यक्षा सौ दर्शना रासम, सेक्रेटरी सौ भारती देशमुख, खजिनदार सौ सोनाली खोजूर्वेकर, ज्येष्ठ सदस्य सौ मृणालिनी कशाळीकर आदी उपस्थित होत्या.
यावेळी डॉ राजेश नवांगुळ यांनी प्रामुख्याने सर्वाइकल कॅन्सरविषयी माहिती देऊन सर्वाइकल कॅन्सर अर्ली स्टेजमध्ये कसा डिटेक्ट होऊ शकतो याबाबत मार्गदर्शन केले. तसेच या कॅन्सरला प्रतिबंध करण्यासाठी व्हॅक्सिन संदर्भात उपयुक्त माहिती देऊन हा आजार होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.