You are currently viewing माता वैष्णोदेवी महाविद्यालय ओरगांव, ता.कणकवली येथे विमा क्षेत्रातील करीयरच्या संधी आणि व्यक्तीमत्व विकास या विषयावर व्याख्यान संपन्न..

माता वैष्णोदेवी महाविद्यालय ओरगांव, ता.कणकवली येथे विमा क्षेत्रातील करीयरच्या संधी आणि व्यक्तीमत्व विकास या विषयावर व्याख्यान संपन्न..

कणकवली

आज दि. 21 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी अकरा वाजता माता वैष्णोदेवी महाविद्यालय ओसरगांव येथे बी.कॉम. बँकींग इन्शोरन्सच्या विद्यार्थ्यांकरीता विमा क्षेत्रातील करीयरच्या संधी आणि व्यक्तीमत्व विकास या विषयावर व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते. भारतीय आर्युविमा महामंडळाच्या सिधुदूर्गनगरी शाखेचे विकास अधिकारी श्री. संग्राम टिपूकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी त्यांनी भविष्यातील करीयरच्या संधी कशा प्रकारे शोधाव्यात, त्याची निवड कशी करावी तसेच स्व:ताचा आत्मविश्वास वाढवून आपल्या व्यक्तीमत्वामध्ये कशा प्रकारे चांगले बदल करावेत याबाबतीत मार्गदर्शन केले.

विमा क्षेत्रा बाबतीत मार्गदर्शन करतांना विविध विमा कंपन्यांची संघटन रचना कश्याप्रकारे असते. विमा क्षेत्राचा विस्तार कशा प्रकारे झाला याबाबतीतही माहीती दिली विमा क्षेत्रात कशा प्रकारे धोके स्वीकारले जातात. आजच्या काळात विविध प्रकारच्या विम्यांचे महत्व सांगीतले. तसेच भारतात विमा क्षेत्राची व्याप्ती कशी आहे. विविध विमा क्लेम कसे होतात आणि या सर्व बाबतीत आयआरडीए कशा प्रकारे नियंत्रण ठेवते याबाबतीत सविस्तर माहीती दिली.

या कार्यक्रमाचे प्रास्तावीक व पाहुण्यांची ओळख महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.समीर तारी यांनी करुन दीली तर आभार प्रा. त्रिवेणी भट यांनी मांडले. यावेळी महाविद्यालयाचे प्रकल्प अधीकारी श्री. संतोष सावंत, सर्व प्राध्यापक वर्ग आणि संबंधीत विभागाचे विद्यार्थी उपस्थीत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा