*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका अभिनेत्री सोनल गोडबोले लिखित अप्रतिम लेख*
*….. फेस्टीव्ह फॅशन…..*
नवरात्रीचे नउ रंग , दसऱ्याला वेगळी साडी आणि मग दिवाळीच्या २ साड्या… एकुण एक ड्झन साड्या दरवर्षी ?? .. मग त्या ठेवायच्या कुठे ?? … एकदा त्यावर फोटो व्हायरल झाले की पुन्हा नेसायला बोअर होतं… मग अशावेळी करायचं काय ?? … आपणच फॅशन डीझायनर व्हायचं.. प्रत्येकाला देवाने अनेक कला दिलेल्या असतात त्या बाहेर काढायच्या…
बऱ्याचदा मी साड्या देउन टाकते कारण कोणासाठी तरी त्या नवीन असतात नाहीतर जुन्या साड्या घ्या त्यांची बॉर्डर बदला कधी त्यावर पॅचवर्क करा.. कधी पाईप , मणी यांनी सजवा.. कधी कधी टिकली वर्क पण छान दिसतं.. खुप सुंदर पॅचेस विकत मिळतात.. खिसा शिवु शकतो…याहीपुढे जाऊन आपण ब्लाउज बदलुन त्याच साड्याना नवीन लुक देउ शकतो.. कधी कॉंट्रास्ट तर कधी हटके फॅशन , कधी लो कट तर कधी लॉंग स्लीव तर कधी स्लीव्हलेस..
मी अनेक वेगवेगळ्या फॅशनचे ब्लाउज आणुन ठेवते आणि प्रत्येकवेळी एकाच साडीवर वेगळा ब्लाउज वापरते त्यामुळे साडीला फेस्टीव्ह लुक येतो…साड्या नवीन घेताना या आयडीया वापरून पहा आणि नवरात्री कमी खर्चात साजरी करा… लाइट वेट सिंपल सोबर साडी आणि ब्लाउज हटके कायमच ग्रेस आणतो…साडीला मधे वेगवेगळे बेल्ट लावुनही नवा लुक देउ शकता..
आता मी येणार माझ्या आवडीकडे तो म्हणजे व्यायाम.. या फॅशनसाठी हवं उत्तम फिजीक फिगर.. त्यासाठी हवा व्यायाम आणि डाएट . योग्य वेळी योग्य गोष्टी खाणं .. फॅशन कॅरी करणं त्यासाठी आत्मविश्वास हवा.. फोटोसाठी पोजेस देताना सुध्दा आपली बॉडी लॅंग्वेज त्या त्या ड्रेसनुसार हवी.. म्हणजे फोटोही चांगले येतात.. आपल्यालाच नाही तर पहाणाऱ्यालाही आनंद मिळायला हवा असं आपलं वागणं,बोलणं, दिसणं असायला हवं…
बऱ्याचजणी पार्लर जाऊन महागडी फेशीअल करतात त्याऐवजी मसुरडाळ वाटुन त्यात दही आणि हळद घालुन संपूर्ण अंगाला लावा.. टॅन निघुन जाऊन त्वचा चमकदार होते.. मी अनेकदा सांगते मी पार्लरला कधीही जात नाही.. व्यायाम, सकारात्मकता , आत्मविश्वास , योग्य आहार, नॉलेज , नम्रता याने येणारा ग्लो कायमस्वरुपी रहातो..
पहा काही टिप उपयोगी पडतात का?? .. साधी रहाणी.. उच्च विचारसरणी…
सोनल गोडबोले
लेखिका,अभिनेत्री