You are currently viewing कोकण रेल्वे मार्गावर कणकवली- हुंबरट दरम्यान नेत्रावती एक्स्प्रेस मधून पडुन एकाच मृत्यू

कोकण रेल्वे मार्गावर कणकवली- हुंबरट दरम्यान नेत्रावती एक्स्प्रेस मधून पडुन एकाच मृत्यू

कणकवली :

 

कोकण रेल्वे मार्गावरून गोवा येथून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या नेत्रावती एक्स्प्रेस मधून प्रवास करीत असताना रेल्वे रुळावर पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मयत व्यक्तीचे नाव नामदेव विष्णू काळे आहे. वय वर्षे ५६ असून उस्मनाबाद  कळंब येथील रहिवासी आहे. ही घटना आज सकाळी ६.४० वाजण्याच्या सुमारास कणकवली तालुक्यातील हुंबरट दरम्यान घडली. नामदेव काळे यांच्यासोबत आणखीन एक व्यक्ती प्रवास करीत होती. पोलिसांनी तिच्याशी संपर्क साधून रत्नागिरी येथून कणकवली येथे बोलावून घेतले. या घटनेबाबत रेल्वे सुरक्षा बलाचे अजय भोई यांनी कणकवली पोलिसांना माहिती दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 10 =