You are currently viewing दोडामार्ग रुग्णालयातील रुग्णवाहिकेवर चालक नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय…

दोडामार्ग रुग्णालयातील रुग्णवाहिकेवर चालक नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय…

नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी वेधले जिल्हा शल्य चिकित्सकांचे लक्ष; तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी…

दोडामार्ग

येथील रुग्णालयातील रुग्णवाहिकेवर चालक नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. तरी याची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील यांच्याकडे केली आहे. दरम्यान या ठिकाणी कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर एवळे यांची सेवा चांगली आहे, मात्र त्यांना प्रशासनाची योग्य साथ मिळत नाही, अशी नाराजीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. श्री. चव्हाण यांनी नगरसेवक व नागरिकांसह आज श्री. पाटील यांची भेट घेत रुग्णालयात भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे लक्ष वेधले.

यावेळी उपनगराध्यक्ष देविदास गवस, नगरसेवक रामचंद्र मणेरीकर, नगरसेविका क्रांती जाधव, नगरसेविका गौरी पार्सेकर, सरपंच देवेंद्र शेटकर, सरपंच पराशर सावंत माजी भाजपा तालुकाध्यक्ष प्रविण गवस, माजी शहराध्यक्ष समीर रेडकर, स्वप्नील गवस,सुमित म्हाडगुत शशांक नाईक आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा