You are currently viewing देवबाग मधील महावितरणच्या डीपी धोकादायक; उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा – जि. प. माजी अध्यक्ष अशोक सावंत

देवबाग मधील महावितरणच्या डीपी धोकादायक; उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा – जि. प. माजी अध्यक्ष अशोक सावंत

मालवण

जिल्ह्याचे पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या तारकर्ली देवबाग मधील महावितरणच्या बहुतांश डीपी धोकादायक बनल्या आहेत. अनेक डीपींची झाकणे गायब झाल्याने ग्रामस्थांचा जीव धोक्यात आला आहे. महावितरणने याकडे दुर्लक्ष केले असून कुठचाही अनुचित प्रकार घडल्यास महावितरण जबाबदार राहणार असल्याचा इशारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सावंत यांनी दिला आहे.

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत यांनी तारकर्ली, देवबाग येथील ग्रामस्थांशी भेटी घेत विकासकामांवर चर्चा केली. यावेळी तारकर्ली आणि देवबाग सीमेवर असणाऱ्या महावितरणचा डिपी हा उघडाच असून जीवितास धोका असल्याचे सांगितले. त्यावर तत्काळ दरवाजा लावणे गरजचे असल्याचे सांगितले. त्यानंतर अशोक सावंत यांनी संबंधित डिपीची पाहणी केली. या विद्युत रोहित्राच्या विज वाहिन्या खाली पडलेल्या आहेत. डिपीला दरवाजा नाही. सध्या जिल्ह्यात शॉक लागून महावितरण कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. इथे तारकर्ली, देवबाग या हमरस्त्यावर डिपी उघडा ठेवण्यात आला आहे. याच गावात दरवर्षी लाखो पर्यटक येतात. या पर्यटन गावात महावितरणने विद्युत रोहित्र अशा प्रकारे ठेऊन अपघातास निमंत्रण देत आहे. या डिपीला झाकण पण नाही आणि रस्त्यापासून दोन फुटाच्या अंतरावर हा डिपी बसविण्यात आला आहे. एखाद्या लहान मुलाचा सुद्धा हात लागू शकतो. विद्युत वाहिन्या लोंबकळत आहेत. शिवाय धोकादायक वळणावर हा विद्युत रोहित्र आहे. त्यामुळे वाहनांचा अपघातही होऊ शकतो. महावितरणचा हा निष्काळजीपणा ग्रामस्थांच्या जीवावर बेतू शकतो. आणि जर दुर्घटना घडल्यास याला महावितरण जबाबदार राहणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या विद्युत रोहित्रावर उपाययोजना न केल्यास आंदोलन करणार असल्याचा श्री. सावंत यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा