You are currently viewing वेंगुर्ला मातोश्री कला क्रीडा मंडळ सार्वजनिक नवरात्रोत्सव समिती स्थापन…

वेंगुर्ला मातोश्री कला क्रीडा मंडळ सार्वजनिक नवरात्रोत्सव समिती स्थापन…

अध्यक्षपदी विलास गावडे व उपाध्यक्षपदी संदेश निकम यांची निवड…

वेंगुर्ले:
दाभोली नाका येथील मातोश्री कला क्रीडा मंडळ सार्वजनिक नवरात्रोत्सव २०२२ ची उत्सव समिती स्थापन करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी उद्योजक विलास गावडे यांची व उपाध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
गेली सलग २७ वर्षे वेंगुर्ले दाभोली नाका येथे मातोश्री कला क्रीडा मंडळाकडून साजरा करण्यात येत असलेल्या श्री देवी नवदुर्गा सार्वजनिक नवरात्र उत्सव २०२२ करिता कार्यक्रम नियोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष विष्णुदास उर्फ दादा कुबल यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी व मान्यवर यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी ही निवड करण्यात आली. यावेळी प्रतिवर्षाप्रमाणे नवरात्रोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, दशावतारी नाटक, फुगडी महोत्सव, संगीत भजन स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, दांडिया, खेळ पैठणीचा, रेकॉर्ड डान्स, प्रतिदिन वारकरी संगीत भजन इत्यादी कार्यक्रमांचा समावेश असून याबाबत नियोजन करण्यात आले. या बैठकीला वसंत तांडेल, प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, सुहास गवंडळकर, जयंत मोंडकर, तुषार साळगावकर, प्रभाकर आजगावकर, सुनिल मांजरेकर, संदेश निकम, भूषण आंगचेकर, बाबली वायंगणकर, पप्पू परब, शरद मेस्त्री, दादा केळुसकर, दत्ताराम आजगावकर, प्रफुल्ल प्रभू, प्रसाद मांजरेकर, प्रमोद वेर्णेकर, तन्मय जोशी, ऋत्विक आंगचेकर, अविनाश सडवेलकर, राहुल मडकईकर, श्रीकांत रानडे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा