You are currently viewing मालवण नगर परिषद आयोजित समुद्र किनारा स्वच्छता मोहीमेची केंद्र शासनाकडून दखल

मालवण नगर परिषद आयोजित समुद्र किनारा स्वच्छता मोहीमेची केंद्र शासनाकडून दखल

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अर्बन या ट्विटर हँडलवरून करण्यात आले मालवण नगरपरिषदेच्या स्वच्छता मोहिमेचे ट्विट

कचरा मुक्त शहर हि संकल्पना अधिक व्यापकतेने राबविण्यासाठी आणि स्वच्छते बाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने (Ministry of Housing & Urban Affairs) स्वच्छ अमृत महोत्सव या कार्यक्रमाची घोषणा केलेली आहे. या कार्यक्रमांतर्गत दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी Indian Swachhata League अंतर्गत Rally of Youth for Garbage Free Beaches, Hills and Tourist Places या कार्यक्रमाचे मालवण नगर परिषदेकडून आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत मालवण शहरात आज शहरातील शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालय, NCC, NSS, सेवाभावी संस्था, हॉटेल व्यावसायिक, लोकप्रतिनिधी, नागरिक सहभागी झाले होते व स्वच्छता शपथ घेऊन दांडी समुद्र किनारा, बंदर जेटी समुद्र किनारा व चिवला समुद्र किनारा येथे स्वच्छता करण्यात आली होती. इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत नगर परिषदेकडून या कार्यक्रमाची माहिती राज्य व केंद्र शासनाला देण्यात आली होती. इंडियन स्वच्छता लीग या लीग मध्ये देशभरातील एकूण 1800 शहरे सहभागी झालेली आहेत व आज या 1800 शहरांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांपैकी काही मोजक्याच शहरांना केंद्र शासनाच्या ट्विटर हँडलवर झळकण्याचा मान मिळाला आहे.

आज झालेल्या समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत स. का पाटील महाविद्यालयाचे NCC व NSS चे विद्यार्थी, जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुल, अ शी दे टोपीवाला महाविद्यालय, भंडारी हायस्कुल, कान्याशाळा तसेच युथ बिट्स फॉर क्लायमेट, झालझुल दांडी मित्र मंडळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रोटरी क्लब, लायन्स क्लब, व्यापारी, पत्रकार, अतिथी बांबू हॉटेल चा सर्व स्टाफ, मच्छीमार बांधव, लोकप्रतिनिधी व नागरिक सहभागी झाले होते.

आज शहारावासीयांकडून नगर परिषदेच्या या स्वच्छता मोहिमेस जो सहभाग मिळाला त्यामुळेच हा सन्मान मिळाल्याचे मालवण नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री संतोष जिरगे म्हणाले. मालवण हे पर्यटन शहर असल्याने स्वच्छता हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे आणि स्वच्छते बाबत नागरिकांकडून असाच प्रतिसाद मिळाला तर या वर्षी होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये सुद्धा मालवण देशपातळीवर चांगला क्रमांक मिळवू शकेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + two =