You are currently viewing . भेंडीची भाजी…
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

. भेंडीची भाजी…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका अभिनेत्री सोनल गोडबोले लिखित अप्रतिम लेख*

*…. भेंडीची भाजी…*

आई मला तुझ्या हातची भेंडीची भाजी खायचेय या माझ्या मुलीच्या फोनवरील वाक्याने मी स्तब्ध झाले कारण मी आई आहे.. सेंसीटीव्ह आहे.. होस्टेल ना राहिले असल्याने आईच्या हातच्या जेवणाची किमत काय असते हे मला चांगलं माहीत आहे.. करीअर , नोकरी यासाठी मुलं बाहेर रहातात त्यामुळे बाहेरचं खावं लागतं.. अगदी तुटपुंज्या पगारात कसंबसं भागवतात .. काहीही खाऊन रहातात .. त्यातुन बऱ्याच जणाना घरी पैसे पाठवायचे असतात .. सगळच त्रासदायक आहे.. पण एकीकडे हे असताना विरोधाभास पाहिला की अजूनच त्रास होतो..
काल कोकणात जाताना वाटेत जेवायला थांबलो.. आमच्या शेजारच्या टेबलवर एक मुलगा आणि मुलगी जेवत होते.. त्यांनी जवळपास ४ जण जेवतील एवढी ऑर्डर दिली होती आणि त्यातील पाव भाग खाउन बिल देउन निघुन गेले.. त्यांच्या पायापाशी एक माउ भुकेने ओरडत होती तिला एक चिकनचा तुकडा घालावा असही त्याना वाटलं नाही उलट त्या माउला त्यांनी हाकलुन दिलं त्यानंतर एक भुभु तिथे आल्यावर त्या वेटरने त्याला मारुन हाकलुन दिलं .. त्याला मारायची गरज नव्हती नुसतं हाकललं असतं तरीही ते गेलं असतं.. त्यांनी टाकलेल्या अन्नावर त्या भु भु आणि माउचं पोट भरलं असतं पण ते अन्न तो वेटर घेउन गेला त्यानंतर त्याने त्या अन्नाचं काय केलं माहीत नाही.. अन्न वाया घालवणं हे मी अनेकदा पहाते आणि दुसरीकडे उपाशी लोक आणि प्राणी पाहीले की जीव कासावीस होतो..
प्रत्येक वेळ ही सारखी नसते तेव्हा माजु नका रे.. आज सगळं आहे म्हणजे उद्या असेलच असं नाही.. प्रत्येक पाऊल उचलताना आणि शब्द वापरताना उद्याची काळजी करा.. क्वार्टर घेउन गणपती मिरवणुकीत नाचणं हे योग्य आहे का किवा मिरवणुकीत आपलं पोरगं मारामारी करतय याकडेही पालकानी लक्ष देणं आणि तरुण पिढीने गरजेचं आहे ..
स्वातंत्र्य आणि स्वैराचार दोन्हीचा अर्थ समजुन घेउन वागा आणि सण साजरे करा.. आता नवरात्र जवळ येतेय .. वाचन करत असताना ते आपल्यात उतरवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा..
सोच बदलो
देश बदलेगा…

सोनल गोडबोले
लेखिका , अभिनेत्री

Advertisement

*🏡”सृष्टी क्रिएटर्स” 🏡*

*घेवून आले आहेत…! सावंतवाडी शहरात “सृष्टी आंगण फेज १” च्या भरघोस प्रतिसादानंतर आता “सृष्टी आंगण फेज २”🏘️*

*_👨‍👩‍👦 तुमच्या कुटुंबाचे शहराच्या मध्यवर्ती घराचे 🏡 स्वप्न पुर्ण करा, तेही अगदी बजेटच्या किंमतीत…!💰_*

*💎♦️आमची वैशिष्ट्ये:-👇*

*▪️मच्छीमार्केट पासून काहीशा अंतरावर…!*

*▪️ कळसुलकर शाळेच्या मागे…!*

*▪️ शहराच्या मध्यवर्ती भागात असून सुध्दा कोलाहलापासून दूर…!*

*▪️नयनरम्य नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी…!*

*▪️आल्हाददायक वातावरणात ब्रॅन्डेड कंपन्याचे मटेरीयल वापरुन बनविण्यात येणारे आलिशान फ्लॅट…!*

*▪️क्ववालीटीशी कोणतीही तडजोड न करता उभारत असलेली सुसज्ज अशी इमारत…!*

*🏃🏻‍♂️चला… तर मग आजच संपर्क करा ☎️*

*🎴आमचा पत्ता:- कळसुलकर इंग्लिश स्कुल, मच्छी मार्केट जवळ, सावंतवाडी*

*संपर्क :- श्री नीरज देसाई*
*📱९४२२०९६५६२*

*सौ. वैदेही देसाई*
*📱९४२२०७६६२०*

प्रतिक्रिया व्यक्त करा