You are currently viewing न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट प्रशालेत डिजिटल वर्गाचे उद्घाटन मोठ्या दिमाखात संपन्न….

न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट प्रशालेत डिजिटल वर्गाचे उद्घाटन मोठ्या दिमाखात संपन्न….

फोंडाघाट

न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट प्रशालेत सावंतवाडीचे सुपुत्र प्रसिद्ध उद्योजक मा. श्री. दीपक माजगावकर व मा.सौ. मानसी माजगावकर यांनी आपल्या स्वखर्चातून फोंडाघाट प्रशालेतील दोन वर्ग डिजिटल करून दिले, त्या डिजिटल वर्गाचे उद्घाटन त्यांच्याच हस्ते करण्यात आले.यापूर्वीही फोंडाघाट प्रशालेच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी माजगावकर दापंत्याने भरीव अशी आर्थिक मदत केली होती. आजचे युग आधुनिक व संगणकाचे असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययन व शिक्षकांच्या अध्यापनात डिजिटल वर्ग असणे काळाची गरज आहे व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशी सुविधा उपलब्ध करून देण्याचे महान कार्य तसेच प्रशालेची गरज लक्षात घेऊन त्याने आपल्या स्वखर्चातून डिजिटल वर्ग उपलब्ध करून दिले आहे.


या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी फोंडाघाट एज्यु. सोसायटीचे चेअरमन मा. श्री.सुभाषजी सावंत, सेक्रेटरी मा. श्री.शेखरजी लिंग्रस, खजिनदार मा. श्री. आनंदजी मर्ये, स्कूल कमिटी चेअरमन मा. श्री.बबनशेठ पवार,संचालक मा.श्री. महेशजी सावंत,मा.श्री. राजन चिके, संस्थेचे माजी चेअरमन तथा संचालक मा. श्री.श्रीकांत आपटे, मा. श्री.मधुकर कुलकर्णी (हैदराबाद),मा. श्री. महेशजी मोदी (बडोदा), प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री. सावंत एस. ए. व प्रशालेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांना अध्ययन व शिक्षणात अध्यापनात डिजिटल माध्यमाचा वापर कसा करता येतो त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. मा. सौ.माजगावकर मॅडम यांनी आपल्या मनोगतपर भाषणात स्पीकिंग इंग्लिशचे महत्व व आपल्या जीवन प्रवासातील अनुभव सांगत डिजिटलचे महत्व पटवून दिले. डिजिटलचा वापर जर अध्यापनात केला, तर खरेच आपल्या प्रशालेची गुणवत्ता वाढेल असा आशावाद व्यक्त केला.तसेच मा.श्री.दीपक माजगावकर यांनी आपल्या आयुष्यातील बऱ्याच उदाहरणाचा दाखला देत, तसेच उद्योजक क्षेत्रात कसा यशस्वी झालो व त्यामुळेच मी आता शिक्षणासाठी गोरगरिबांच्या मुलांना शिकता येईल, म्हणून मदतीचा हात देण्याचा माझा सतत मानस आहे असे विचार आपल्या मनोगतातून व्यक्त केले. मा. श्री.राजनजी चिके,मा.श्री. महेशजी सावंत, मा. श्री. श्रीकांत आपटे, संस्थेचे चेअरमन मा.श्री. सुभाषजी सावंत यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देऊन गुणवत्ता वाढवण्याचा सतत प्रयत्न करत आहोत याविषयी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री. सावंत सर यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रा. जोईल सर तर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार श्री.पेडणेकर सर यांनी मानून कार्यक्रमाची सांगता केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − fourteen =