You are currently viewing विजयदुर्ग किनाऱ्यानजीक तेलवाहतूक करणारे जहाज बुडाले

विजयदुर्ग किनाऱ्यानजीक तेलवाहतूक करणारे जहाज बुडाले

१९ कर्मचाऱ्यांना वाचविण्यात यश

 

देवगड :

 

दुबईहून-बेंगलोरच्या दिशेने जाणारे पार्थ हे तेलवाहतूक करणारे जहाज विजयदुर्ग किनाऱ्यानजीक बुडाले. सुदैवाने या जहाजावरील सर्व कर्मचाऱ्यांना वाचविण्यात तटरक्षक दलाला यश आले आहे. ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. हे तेलवाहू जहाज दुबईहून बेंगलोरच्या दिशेने जात असताना जहाजाच्या तळाला भोक पडल्याने विजयदुर्ग किनाऱ्यापासून चाळीस वावामध्ये हे जहाज बुडू लागले. यावेळी या जहाजावर १९ कर्मचारी होते. जहाज बुडत असल्याचे लक्षात येताच जहाजावरील कर्मचाऱ्यांनी तटरक्षक दलाशी संपर्क साधला.

जहाजमध्ये अॅस्फाल्ट बिटुमेन 3911 एमटी पार्थ वाहून नेण्यात येत होते. जहाज बुडणार याची खात्री झाल्यावर क्रू ने जहाज सोडून दिले. गस्त घालणारी दोन तटरक्षक जहाजे अपघातग्रस्त जहाजाकडे वळवण्यात आली. त्यानंतर रत्नागिरी तटरक्षक दलाने मुंबई व गोवा तटरक्षक दलाची मदत घेतली. गोवा येथून दोन जहाजे आणि एक हेलिकॉप्टरच्या सहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन तटरक्षक दलाने यशस्वी केले. बुडत असलेल्या जहाजातील 19 जणांना वाचवण्यात भारतीय तटरक्षक दलाला यश आहे. यामध्ये 18 भारतीय आणि 01 इथिओपियन मास्टरसह 19 जणांना मोटार टँकर जहाजातून यशस्वीरित्या बाहेर काढले. हे जहाज यूएईच्या खोर फक्कन येथून न्यू मंगलोरला जाणार होते अशी माहिती देण्यात आली. मात्र जहाज वाचवू शकले नाही. विजयदुर्ग ते मालवण पर्यंतच्या समुद्रात तेल प्रदूषण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मच्छीमारांनी मासेमारी दरम्यान योग्य ती दक्षता घ्यावी असे आवाहन सहाय्यक मत्स्य आयुक्त रवींद्र मालवणकर यांनी केले आहे.

दरम्यान गेले काही दिवस समुद्रात जोरदार वादळी वारे वाहत आहेत. त्यात समुद्रही खवळला आहे. सिंधुदुर्गात पावसाचा जोर जरी ओसरला असला तरी हवामान विभागाने दक्षतेचा इशारा दिला आहे. त्यातच मागील चार दिवसांपूर्वी समुद्रात वादळी वारे मोठ्या प्रमाणावर वाहत असल्याने मासेमारी करणाऱ्या गुजराथ, रत्नागिरी पासूनच्या अनेक नौका देवगड येथील बंदरात सुरक्षितस्थळी दाखल झाल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 2 =